ऑस्ट्रेलियाने फास आवळला; दक्षिण आफ्रिकेचं नशीब, जो डेव्हिड मिलर उभा राहिला 

ICC ODI World Cup AUS vs SA Semi Final Live : ICC स्पर्धा म्हटलं की ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व आलेच... त्यांनी पाच वन डे वर्ल्ड कप जिंकून ते सिद्धही केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 06:14 PM2023-11-16T18:14:47+5:302023-11-16T18:17:23+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup AUS vs SA Semi Final Live : dominance of australian bowlers, David David Miller score a century; South Africa all out 212 | ऑस्ट्रेलियाने फास आवळला; दक्षिण आफ्रिकेचं नशीब, जो डेव्हिड मिलर उभा राहिला 

ऑस्ट्रेलियाने फास आवळला; दक्षिण आफ्रिकेचं नशीब, जो डेव्हिड मिलर उभा राहिला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup AUS vs SA Semi Final Live : ICC स्पर्धा म्हटलं की ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व आलेच... त्यांनी पाच वन डे वर्ल्ड कप जिंकून ते सिद्धही केले आहे. पण, या वर्ल्ड कपमध्ये त्यांची जी सुरूवात झाली, ते पाहता उपांत्य फेरीचेही वांदे होते. मात्र, हार मानेल तो ऑसी संघ कुठे... त्यांनी दमदार पुनरागमन केले आणि उपांत्य फेरीत धडक दिली. दुसरीकडे भारतानंतर वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेने दबदबा राखला होता. मात्र, आज ऑस्ट्रेलियाने त्यांना जमिनीवर आणले होते. डेव्हिड मिलर खेळला नसता तर आफ्रिकेला सन्मानजनक धावसंख्या उभारता आल्या नसत्या. 

२ चेंडूंत मॅच फिरली! ९५ धावांची भागीदारी पार्ट टाईम गोलंदाजाने तोडली; आफ्रिकेची घसरगुंडी Video

ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्क व जोश हेझलवूड यांनी पहिल्या १३ षटकांत दक्षिण आफ्रिकेला ४ धक्के दिले. स्टार्क व हेझलवूड यांच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेची मजबूत फलंदाजांची फळी ढेपाळली. या वर्ल्ड कप स्पर्धेत आफ्रिकेच्या फलंदाजांनी आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाचा पालापाचोळा केला होता, परंतु आज पाचवेळच्या विजेत्या ऑसींनी त्यांना जमिनीवर आणले. ऑस्ट्रेलियाला आयसीसी स्पर्धांचा बादशाह का म्हणतात, हे पुन्हा अधोरेखित झाले. डेव्हिड मिलर आणि हेनरिच क्लासेन यांनी ९५ धावांची भागीदारी करून संघाला सुस्थितीत आणले. या दोघांसमोर प्रमुख गोलंदाज अपयशी ठरत असताना पार्ट टाईम गोलंदाज ट्रॅव्हिस हेडने कमाल केली. 

Image
हेडने टाकलेला चेंडू ४.३° कोनातून वळला अन् क्लासेनचा त्रिफळा उडवला. या वर्ल्ड कपमधील हा सर्वात वळलेला चेंडू ठरला. क्लासेन ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४७ धावांवर बाद झाला आणि मिलरसह त्याची ९५ धावांची ( ११३ चेंडू) भागीदारी संपुष्टात आली. पाठोपाठ त्याने मार्को यान्सेनलाही ( ०) माघारी पाठवले. ग्लेन मॅक्सवेल व अॅडम झम्पा यांचा चेंडू अनुक्रमे ३.४ व २.४ डिग्री कोनातून फिरत होते, त्यापेक्षा हेडचा चेंडू अधिक वळत असल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. मिलरने अर्धशतक पूर्ण करताना आफ्रिकेला सन्मानजनक धावसंख्येची दिशा दिली होती आणि त्याला गेराल्ड कोएत्झीची चांगली साथ मिळाली. मिलर व कोएत्झी यांची ५३ धावांची भागीदारी पॅट कमिन्सने तोडली. कोएत्झी १९ धावांवर झेलबाद झाला, परंतु त्याने DRS घेतला असता तर तो नाबाद राहिला असता. 

Image
२०१५ च्या बाद फेरीतील सामन्यात फॅफ ड्यू प्लेसिसने न्यूझीलंडविरुद्ध ८२ धावांची खेळी केली होती आणि ती वर्ल्ड कपच्या बाद फेरीतील आफ्रिकेकडून झालेली सर्वोत्तम वैयक्तिक खेळी होती. आज मिलरने हा विक्रम स्वतःच्या नावावर केला. ऑसींचा प्रमुख गोलंदाज स्टार्क आला अन् त्याने केशव महाराजला माघारी पाठवला. मिलरने षटकाराने शतक पूर्ण केले. पण, अखेरच्या षटकांत धावा वाढवण्याच्या प्रयत्नात मिलर सीमारेषेवर झेलबाद झाला. त्याने ११६ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह १०१ धावांची खेळी केली. आफ्रिकेचा संपूर्ण संघ ४९.४ षटकांत २१२ धावांवर माघारी परतला. कमिन्स व स्टार्क यांनी प्रत्येकी ३, तर हेझलवूड व हेड यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. 

Web Title: ICC ODI World Cup AUS vs SA Semi Final Live : dominance of australian bowlers, David David Miller score a century; South Africa all out 212

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.