ICC ODI World Cup AUS vs SA Semi Final Live : वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात पाहून हा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतही नव्हता. पण, एकदा सूर गवसला की ऑसी मागे वळून पाहत नाही आणि आताही तेच घडले. अफगाणिस्तानविरुद्ध ग्लेन मॅक्सवेलच्या नाबाद द्विशतकी खेळीने कांगारूंना उपांत्य फेरीत पोहोचवले आणि आज पाच वेळच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाने दक्षिण आफ्रिकेला पाणी पाजले. आफ्रिकेची स्पर्धेतील वाटचाल ही अविश्वसनीय राहिलेली आहे, परंतु आज त्यांनी चोकर्स हा शिक्का पुन्हा सार्थ ठरवला.
टेम्बा बवुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पूर्णपणे तंदुरूस्त नसूनही खेळणरा टेम्बा बवुमा ( ०) पुन्हा फेल गेला. मिचेल स्टार्कने ही विकेट घेतली. जोश हेझलवूडने अचूक मारा करून आफ्रिकेच्या फलंदाजांवर दडपण निर्माण केले होते. सहाव्या षटकात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात क्विंटन डी कॉक ( ३) झेलबाद झाला. स्पर्धेत ५९४ धावा चोपणारा क्विंटन डी कॉक ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या दडपणाला बळी पडला. पहिल्या १० षटकात ऑसी गोलंदाजांनी चांगलेच वर्चस्व गाजवले आणि आफ्रिकेला १८ धावांवर समाधानी मानायला भाग पाडले.
११व्या षटकात स्टार्कने आफ्रिकेला आणखी एक धक्का देताना एडन मार्करमला ( १०) बाद केले. पाठोपाठ हेझलवूडने रॅसी व्हॅन डेर ड्युसेनची ( ६) विकेट घेऊन आफ्रिकेला चौथा धक्का दिला. स्टार्कने १२० वन डे त प्रथमच सलग ७ षटकं फेकली. १३व्या षटकानंतर ऑसींनी गोलंदाजीत बदल करताना पॅट कमिन्स व अॅडम झम्पा यांना आणले गेले. १४व्या षटकानंतर पाऊस सुरू झाला आणि मॅच थाबंली आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास राखीव दिवस आहे. राखीव दिवशीही मॅच न झाल्यास आफ्रिका फायनलमध्ये जाईल, कारण साखळी फेरीत त्यांचे गुण हे ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त आहेत.