ICC ODI World Cup AUS vs SA Semi Final Live : दक्षिण आफ्रिकेची मजबूत फलंदाजांची फळी आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ढेपाळली. ऑस्ट्रेलियाने त्यांचा संपूर्ण संघ २१२ धावांवर माघारी पाठवला आणि डेव्हिड वॉर्नर व ट्रॅव्हिस हेड यांनी चोप दिला. पण, एडन मार्करमने त्याच्या पहिल्या षटकात वॉर्नरचा त्रिफळा उडवला. पाठोपाठ रॅसी व्हॅन डेर ड्युसेनच्या अविश्वसनीय झेलने ऑस्ट्रेलियाचा खेळ केला...
तेव्हा २१३ आता २१२! ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये होणार १९९९ची पुनरावृत्ती?
मिचेल स्टार्क व जोश हेझलवूड यांनी सुरुवातीच्या षटकांत प्रत्येकी २ विकेट्स घेत आफ्रिकेची अवस्था ४ बाद २४ अशी दयनीय केली होती. डेव्हिड मिलर आणि हेनरिच क्लासेन हो जोडी मैदानावर उभी राहिली आणि त्यांनी ९५ धावांची भागीदारी करून संघाला सुस्थितीत आणले. या दोघांसमोर प्रमुख गोलंदाज अपयशी ठरत असताना पार्ट टाईम गोलंदाज ट्रॅव्हिस हेडने कमाल केली. हेडने टाकलेला चेंडू ४.३° कोनातून वळला अन् क्लासेनचा ( ४७) त्रिफळा उडवला. या वर्ल्ड कपमधील हा सर्वात वळलेला चेंडू ठरला. पाठोपाठ त्याने मार्को यान्सेनलाही ( ०) माघारी पाठवले. मिलर व गेराल्ड कोएत्झी ( १९) यांची ५३ धावांची भागीदारी पॅट कमिन्सने तोडली. अखेरच्या षटकांत धावा वाढवण्याच्या प्रयत्नात ११६ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह १०१ धावांवर बाद झाला. आफ्रिकेचा संपूर्ण संघ ४९.४ षटकांत २१२ धावांवर माघारी परतला.
डेव्हिड वॉर्नर व ट्रॅव्हिस हेड या दोघांनी जी सुरुवात करून दिली, ते पाहता मॅच लवकर संपवण्याच्या निर्धाराने ऑस्ट्रेलिया मैदानावर उतरल्याचे जाणवले. या दोघांची ३८ चेंडूंवर ६० धावांची भागीदारी एडन मार्करमने तोडली. आपल्या पहिल्याच षटकात मार्करमने चेंडू अप्रतिम वळवला अन् वॉर्नरचा ( २९) त्रिफळा उडवला. या विकेटनंतर आफ्रिकेच्या ताफ्यात चैतन्य संचारले... कागिसो रबाडाच्या षटकात मिचेल मार्शने कव्हरच्या दिशेने खणखणीत फटका मारला, पंरतु रॅसी व्हॅन डेर ड्युसेनने तितक्याच चपळाईने हवेत झेप घेत झेल टिपला. मार्श भोपळ्यावर माघारी परतला.
Web Title: ICC ODI World Cup AUS vs SA Semi Final Live :UNBELIEABLE, Rassie van der Dussen take great diving catches in the covers to remove Mitchell Marsh, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.