BAN vs AFG : बांगलादेशने सहज विजय मिळवला, अफगाणिस्ताविरुद्ध 'मिराझ' चमकला

ICC ODI World Cup BAN vs AFG : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशने पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध चमकदार कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 04:21 PM2023-10-07T16:21:11+5:302023-10-07T16:24:05+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup BAN vs AFG : BANGLADESH BEAT AFGHANISTAN BY 6 WICKETS, Mehidy Hasan is the hero with 57 runs & 3 wickets | BAN vs AFG : बांगलादेशने सहज विजय मिळवला, अफगाणिस्ताविरुद्ध 'मिराझ' चमकला

BAN vs AFG : बांगलादेशने सहज विजय मिळवला, अफगाणिस्ताविरुद्ध 'मिराझ' चमकला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup BAN vs AFG : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशने पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध चमकदार कामगिरी केली. मेहिदी हसन मिराझ ( Mehidy Hasan Miraz  ) याने अष्टपैलू कामगिरी करून बांगलादेशला सहज विजय मिळवून दिला. 


बांगलादेशने नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. रहमनुल्लाह गुरबाज ( ४७) आणि इब्राहिम झाद्रान ( २२) यांनी सुरुवात तर चांगली करून दिली. पण, शाकिब अल हसन ( ३-३०) आणि मेहिदी हसन मिराझ ( ३-२५) यांच्या फिरकीने कमाल केली. आझमतुल्लाह ओमारझाई ( २२), कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी ( १८), रहमत शाह ( १८) यांनी हातभार लावला. शोरिफूल इस्लामने २ विकेट्स घेतल्या.१ बाद ८३ अशा मजबूत स्थितीत असलेला अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ ३७.२ षटकांत १५६ धावांत तंबूत परतला. 


बांगलादेशचा सलामीवीर तानझीद हसन ( ५) रन आऊट झाला आणि लिटन दासही ( १५) फेल गेला. त्यामुळे त्यांची अवस्था २ बाद २७ अशी झाली होती. मेहिदी हसन मिराझ आणि नजमूल होसैन शांतो यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ३ विकेट्स घेणाऱ्या मिराजने अर्धशतक झळकावले आणि शांतोसह तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. मिराझ ७३ चेंडूंत ५ चौकारांसह ५७ धावांवर बाद झाला.  शाकिबने पटापट सामना संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो १४ धावांवर झेलबाद झाला. शांतो ८३ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ५९ धावांवर नाबाद राहिला. बांगलादेशने ३४.४ षटकांत ४ बाद १५८ धावा करून ६ विकेट्सने सामना जिंकला. 
 

Web Title: ICC ODI World Cup BAN vs AFG : BANGLADESH BEAT AFGHANISTAN BY 6 WICKETS, Mehidy Hasan is the hero with 57 runs & 3 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.