Join us  

BAN vs AUS Live : बांगला 'टायगर्स'कडून कागारूंची शिकार! ऑस्ट्रेलियासमोर लक्ष्य तीनशे पार...

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाद होण्याचा पहिला मान पटकावणाऱ्या बांगलादेशने आज अखेरच्या साखळी सामन्यात दमदार फटकेबाजी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 2:24 PM

Open in App

ICC ODI World Cup BAN vs AUS Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाद होण्याचा पहिला मान पटकावणाऱ्या बांगलादेशने आज अखेरच्या साखळी सामन्यात दमदार फटकेबाजी केली. अडखळत सुरूवातीनंतर सूर गवसलेल्या ऑस्ट्रेलियाने सातत्य राखून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पण, त्यांना आज शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेशने चांगला मार दिला. तोवहिद हृदोयचे अर्धशतक अन् कर्णधार नमजूल होसैन शांतो यांच्या फटकेबाजीने बांगलादेशने तीनशेपार धावा उभ्या केल्या.

PAK vs ENG Live : पाकिस्तानसमोर ६.१ षटकांत ३०० धावांचे लक्ष्य; इंग्लंडने टॉस जिंकून केली कोंडी

तनझिज हसन ( ३६) आणि लिटन दास ( ३६) यांनी बांगलादेशला सकारात्मक सुरुवात करून दिली. या दोघांनी ११ षटकांत ७६ धावा उभ्या केल्या. सीन एबॉटने बांगलादेशला पहिला धक्का देताना तनझिदला कॉट अँड बोल्ड केले. त्यानंतर नजमूलने लिटनसह चांगला खेळ केला. अॅडम झम्पाने दुसरा सलामीवीर लिटनला बाद केला. हृदोय व नजमूल यांची जोडी पुन्हा एकदा चांगली जमली. नजमूल ४५ धावांवर बाद झाल्यानं त्यांची ७० धावांची भागीदारी तुटली. हृदोय ७९ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ७४ धावांवर माघारी परतला.

महमुदुल्लाह ( ३२), मुश्फीकर रहिम ( २१) व मेहीदी हसन मिराझ ( २९) यांनी छोटेखानी योगदान दिले. पण, त्यांना अखेरच्या १० षटकांत केवळ ६७ धावाच करता आल्या. बांगलादेशने ५० षटकांत ८ बाद ३०६ धावा केल्या. एबॉट व झम्पा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. 

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपआॅस्ट्रेलियाबांगलादेश