ICC ODI World Cup ENG vs NED Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या इंग्लंडसमोर आता २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीची पात्रता हे लक्ष्य आहे. त्यासाठी त्यांना वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अव्वल आठ संघांमध्ये स्थान मिळवावे लागेल. उर्वरित दोन्ही सामने जिंकून त्यांना हे शक्य आहे आणि आज त्यांनी नेदरलँड्सची धुलाई केली. बेन स्टोक्स व ख्रिस वोक्स यांची ७व्या विकेटसाठीची शतकी भागीदारी महत्त्वाची ठरली.
जो रूट अतरंगी OUT! नसतं धाडस आलं असतं अंगलट, चेंडू ढेंग्याखालून यष्टिंवर आदळला, Video
गतविजेत्या इंग्लंडची सुरुवातच फार चांगली झाली नाही. सातव्या षटकात आर्यन दत्तने सलामीवीर जॉनी बेअरस्टोली ( १५) माघारी पाठवले. डेविड मलान आणि जो रूट यांनी ९३ धावांची भागीदारी करताना डावाला आकार दिला. पण, नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी पुन्हा तो बिघडवला. जो रूट ( २८), हॅरी ब्रूक ( ११), कर्णधार जोस बटलर ( ५), मोईन अली ( ४) हे झटपट माघारी परतल्याने इंग्लंडची अवस्था ६ बाद १९२ अशी झाली. मलान ७४ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ८७ धावांवर रन आऊट झाला.
बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्स यांनी सातव्या विकेटसाठी १२९ धावांची दमदार भागीदारी केली. वोक्स ४५ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५१ धावांवर माघारी परतला. इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा आणि २५०+ विकेट्स घेणारा बेन स्टोक्स पहिला खेळाडू ठरला. जॅक कॅलिस, सनथ जयसूर्या, ख्रिस गेल, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, मोहम्मद हाफीज, कार्ल हूपर, शाहीद आफ्रिदी, शेन वॉटसन यांनी आपापल्या संघासाठी असा पराक्रम केला आहे. बेन स्टोक्सने ८४ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह १०८ धावा केल्या. इंग्लंडने ५० षटकांत ९ बाद ३३९ धावा केल्या.
Web Title: ICC ODI World Cup ENG vs NED Live : HUNDRED BY BEN STOKES ( 108), he becomes the first England player to score 10,000+ runs and pick 100+ wickets in international cricket, England 339/9
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.