ICC ODI World Cup ENG vs NED Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी गतविजेता इंग्लंडचा संघ जेतेपदाच्या दावेदारांपैकी एक होते. पण, प्रत्यक्षात ७ पैकी त्यांना केवळ १ सामना जिंकता आलाय. आयसीसीच्या नव्या नियमानुसार २०२५मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत या वर्ल्ड कपमधील अव्वल ८ संघांनाच खेळता येणार आहे. त्यामुळे आजचा नेदरलँड्स आणि पुढे पाकिस्तानविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. हे दोन्ही सामने जिंकून त्यांना ८व्या क्रमांकावर येता येईल. पण, आजही त्यांच्याकडून चूका झालेल्या दिसल्या. जो रूटची विकेट तर या वर्ल्ड कपमधील हास्यास्पद विकेट ठरलीय.
दक्षिण आफ्रिका vs ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीचा सामना! टीम इंडियाला भिडण्यासाठी ३ संघ शर्यतीत
स्पर्धेचा शेवट गोड करून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शर्यतीत कायम राहण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या गतविजेत्या इंग्लंडने सुरुवात चांगली केली. पण, नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी त्यांना धक्के दिले. आर्यन दत्तने सातव्या षटकात जॉनी बेअरस्टोली ( १५) माघारी पाठवले. डेविड मलान आणि जो रूट यांनी ९३ धावांची भागीदारी केली आणि इंग्लंडला पुन्हा सावरले. व्हॅन बीकने ही भागीदारी तोडताना रूटला ( २८) त्रिफळाचीत केले. रूट त्याने विकसित केलेला रिव्हर्स स्वीच मारायला गेला अन् त्याच्या पायामधून चेंडू यष्टींवर आदळला.