Join us  

पहिल्या चेंडूवर ड्रामा! इंग्लंडच्या खेळाडूने सहकाऱ्याला फसवलं, पाहा Video नेमकं काय घडलं

ICC ODI World Cup ENG vs SL Live : इंग्लंड आणि श्रीलंका हे दोन्ही संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सध्या बुडणाऱ्या नावेतून प्रवास करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 3:13 PM

Open in App

ICC ODI World Cup ENG vs SL Live : इंग्लंड आणि श्रीलंका हे दोन्ही संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सध्या बुडणाऱ्या नावेतून प्रवास करत आहेत. दोन्ही संघांना ४पैकी ३ सामन्यांत हार पत्करावी लागली आहे आणि वाट्याला केवळ १ विजय आहे. त्यामुळे त्यांना उर्वरित पाचही सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. आजच्या सामन्याचा निकाल हा दोघांपैकी एका संघाला स्पर्धेबाहेर फेकण्यासाठी पुरेसा ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ जीवतोडून खेळतील यात शंका नाही. पण, इथे इंग्लंडच्याच खेळाडूने सहकाऱ्याला फसवल्याचा प्रकार घडलेला पहायला मिळाला.

स्पर्धेतील आव्हान टीकवण्यासाठी मैदानावर उतरलेल्या इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात दमदार सामना पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि जॉनी बेअरस्टो व डेविड मलान यांनी संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. मागील ४ वर्ल्ड कप स्पर्धांमधील दोन संघांमधील आकडेवारी पाहिल्यास इंग्लंडला एकदाही श्रीलंकेला हरवता आलेले नाही. रिप्लेसमेंट म्हणून संघात उशीराने दाखल झालेल्या अनुभवी अँजेलो मॅथ्यूजने त्याच्या पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला. मलान २५ चेंडूंत २८ धावा करून झेलबाद झाला.  

डावाच्या पहिल्याच चेंडूवर जॉनी बेअरस्टो बाद झाला असता. दिलशान मधुशंकाने पहिलाच चेंडू यॉर्कर टाकला अन् तो बेअरस्टोने सरळ बॅटने खेळला... इंग्लंडला चौकार मिळाला, परंतु रिप्लेत चेंडू आधी बेअरस्टोच्या पायावर आदळल्याचे दिसले अन् श्रीलंकेने रिव्ह्यू घेतला असता तर बेअरस्टो बाद झाला असता असे रिप्लेत दिसले...

याच बेअरस्टोने नंतर १०व्या षटकात जो रूटला फसवले. महिशा थिक्षणाच्या चेंडूवर रुटने सुरेख कट मारला अन् चेंडू मॅथ्यूजकडे गेला. तोपर्यंत बेअरस्टोने १ धावसाठी रूटला आधी होकार दिला होता. पण, मॅथ्यूज थ्रो करणार असे दिसताच त्याने रूटला माघारी पाठवले अन् श्रीलंकेला मोठी विकेट मिळाली. त्यानंतर आलेल्या बेन स्टोक्सला जीवदान मिळाले. ही चूक श्रीलंकेच्या खेळाडूंनी भरून काढली. कसून रंजिथाच्या चेंडूवर बेअरस्टोचा ( ३०) अफलातून झेल धनंजयाने पकडला. इंग्लंडचा तिसरा फलंदाज ६८ धावांवर माघारी परतला. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपश्रीलंकाइंग्लंडजो रूट