ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : भारतीय संघाला वर्ल्ड कप फायनलमध्ये पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर भारताला २४० धावाच करता आल्या. पण, याही धावा विजयासाठी पुरेशा आहेत, कारण १९८३मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १८३ धावांचा यशस्वी बचाव केला होता.
ALL OUT! विराट कोहली, KL Rahul यांनी लाज वाचवली; आता भारतीय गोलंदाजांच्या खांद्यावर जबाबदारी!
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी वर्ल्ड कप फायनलचा पहिला टप्पा गाजवला. रोहित शर्माच्या ( ४७) आक्रमक सुरुवातीच्या जोरावर भारताने पहिल्या १० षटकांत २ बाद ८० धावा फलकावर चढवल्या होत्या. पण, शुबमन गिल ( ४) व श्रेयस अय्यर ( ४) हे अपयशी ठरले. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी डाव सावरला होता, परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्यांना दबावाखाली ठेवले होते. या दोघांना पहिला चौकार मिळवण्यासाठी ९७ चेंडू खेळावी लागली. या दोघांची १०९ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी पॅट कमिन्सने तोडली. विराट ५४ धावांवर आणि लोकेश ६६ धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजा ( ९), मोहम्मद शमी ( ६), सूर्यकुमार यादव ( १८), जसप्रीत बुमराह ( १), कुलदीप यादव ( १०) व मोहम्मद सिराज ( नाबाद ९) यांनी थोडा हातभार लावला.
११ ते ४० षटकांत भारतीय फलंदाजांना केवळ ४ चौकार मारता आले, यावरून समजते की ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकांनी किती सुरेख कामगिरी केली. मिचेल स्टार्कने ३, तर जोश हेझलवूड व पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. भारतीय संघाने १९८३च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये १८३ धावांचा यशस्वी बचाव करून इतिहास रचला होता. पाकिस्ताननेही १९९२ मध्ये ६ बाद २४९ धावांचा, ऑस्ट्रेलियाने १९८७ व २००७ मध्ये अनुक्रमे ५ बाद २५३ व ४ बाद २८१ धावांचा, वेस्ट इंडिजने १९७९ व १९७५ मध्ये अनुक्रमे ९ बाद २८६ व ८ बाद २९१ धावांचा, तर ऑस्ट्रेलियाने २००३ मध्ये २ बाद ३५९ धावांचा यशस्वी बचाव केला होता.
Web Title: ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : India 240 all out, check Winning score after batting first in the Men's World Cup final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.