ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : नरेंद्र मोदी स्टेडियमवरील वातावरण टीव्हीवर पाहतानाही अंगावर काटा उभा राहिल असं आहे... ऑस्ट्रेलियाच्या 'अरे' ला, टीम इंडियाकडून 'का रे' असे उत्तर मिळताना दिसतेय... मोहम्मद शमीने विकेटची बोहोनी करून दिल्यानंतर जसप्रीत बुमराहने मैदानावर आग लावली आहे. त्याच्या अप्रतिम चेंडूने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना गोंधळून टाकले. त्यात विराट कोहलीचं रांगडी सेलिब्रेशन प्रेक्षकांची एनर्जी वाडवणारा ठरतोय... विराटने मार्नस लाबुशेनची केलेली स्लेजिंग ऑसी फलंदाजावर दडपण टाकणारी ठरतेय.
वॉर्नरची विकेट बुमराहच्या नव्हे तर शमीच्या नशीबी; पहिल्याच चेंडूवर विराटची चूक अन्.., Video
जसप्रीत बुमराहने पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला माघारी पाठवलाच होता, परंतु विराट व शुबमन यांच्यात तू की मी या संभ्रमात चेंडू दोघांच्या मधून चौकार गेला. वॉर्नर व ट्रॅव्हिस हेड यांनी त्या षटकात १५ धावा कुटल्या. रोहितने लगेच दुसऱ्या षटकात मोहम्मद शमीला आणले अन् वॉर्नरचा ( ७) स्लीपच्या दिशेने उडालेला झेल यावेळी विराटने टिपला. शाहरुख खान, रणवीर सिंगसह प्रेक्षक जल्लोष करताना दिसले. त्यात जसप्रीतने त्याच्या तिसऱ्या षटकात डेंजर मिचेल मार्शचा ( १५) अडथळा दूर केला. जसप्रीतने टाकलेला चेंडू फार ग्रेट नव्हता, परंतु मिचेलच्या बॅटची किनार घेत तो यष्टिरक्षक लोकेश राहुलच्या हाती विसावला. यासह लोकेशने या वर्ल्ड कपमध्ये १७वा बळी ( १६ झेल व १ स्टम्पिंग) टिपून राहुल द्रविड ( १६ बळी, २००३) आणि महेंद्रसिंग धोनी ( १५ बळी, २०१५) यांचा विक्रम मोडला.