ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : वन डे वर्ल्ड कप फायनलसाठी जेव्हा रिचर्ड केटलबोरो या अम्पायरचं नाव जाहीर झालं, तेव्हा भारतीय चाहते टेंशनमध्ये गेले होते. हे अम्पायर भारतासाठी आयसीसी स्पर्धेत कधीच लकी ठरले नव्हते, असा इतिहास आहे. त्यामुळे हे टेंशन वाढलेले, त्यात त्यांच्या एका निर्णयाने आजच्या मॅचलाही कलाटणी मिळता मिळता राहिली आणि जसप्रीत बुमराहची तार सटकली. त्याने थेट अम्पायरचा जाब विचारला...
विराटचा स्वॅग! इथे गोलंदाज विकेटसाठी प्रयत्न करत होते, तर याचा वेगळाच खेळ होता सुरू, Video
मोहम्मद शमीने त्याच्या पहिल्याच षटकात भारताला यश मिळवून देताना डेव्हिड वॉर्नरला ( ४) माघारी पाठवले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने पुढील षटकांत मिचेल मार्श ( १५) व स्टीव्ह स्मिथ ( ४) यांना बाद केले. स्मिथ DRS घेतला असता तर जसप्रीतला ही विकेट मिळाली नसती. ट्रॅव्हिस हेड व मार्नस लाबुशेन यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण करताना ऑस्ट्रेलियाला २० षटकांत १०४ धावांपर्यंत पोहोचवले. दव पडण्यापूर्वी रोहितने दोन्ही फिरकीपटूंना गोलंदाजीला आणले आणि त्यांनी ऑसींच्या धावांवर अंकुश ठेवला होता. हेडने ५८ चेंडूंत या वर्ल्ड कपमधील दुसरे अर्धशतक पूर्ण केले.
ही जोडी तोडण्यासाठी शमीला गोलंदाजीला आणले अन् हेडने त्याच्या डोक्यावरून चौकार खेचून स्वागत केले. भारताला यावेळी सहाव्या गोलंदाजाची उणीव प्रकर्षाने जाणवत होती. शमीला या दोघांनी टार्गेट करायला सुरुवात केलेली पाहून स्टेडियम पुन्हा शांत झाले. लाबुशेन आज कोणतेही फॅन्सी शॉट मारत नसल्याने रवी शास्त्रींनी त्याचे कौतुक केले. लाबुशेन व हेड यांनी शतकी भागीदारी करून सामना एका बाजूने झुकवला. २८व्या षटकात बुमराहने लाबुशेनसाठी LBW चे जोरदार अपील केले, परंतु मैदानावरील पंचांनी नाबाद दिले. DRS मध्ये अम्पायर्स कॉल राहिल्याने लाबुशेन वाचला. पण, त्या षटकात १४ धावा चोपल्या गेल्या.
रिचर्ड केटलबोरो अन् भारताचा छत्तीसचा आकडा..
२०१३नंतर आयसीसीकडून आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये भारताला अपयशाचा सामना करावा लागला. २०१३ नंतर भारत तब्बल आठवेळा आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीत दाखल झाला होता आणि विशेष म्हणजे त्यातील सात सामन्यांमध्ये रिचर्ड केटलबोरो हे अम्पायर्स पॅनलमध्ये सहभागी होते. रिचर्ड केटलबोरो हे २०१४ मध्ये भारत विरुद्ध श्रीलंका टी-ट्वेंटी वर्ल्ड फायनल, २०१५ मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे वर्ल्ड कप सेमीफायनल, २०१७ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आणि २०१९ मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड या सेमीफायनल सामन्यासाठी मैदानी अम्पायर होते. तसंच भारत पराभूत झालेल्या आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दोन अंतिम सामन्यांत केटलबोरो हे टीव्ही अंपायर म्हणून काम पाहात होते.
Web Title: ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : Marnus Labuschagne survives an LBW review due to the umpire's call, Jasprit Bumrah has a word with Richard Kettleborough, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.