Join us  

वॉर्नरची विकेट बुमराहच्या नव्हे तर शमीच्या नशीबी; पहिल्याच चेंडूवर विराटची चूक अन्.., Video 

ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : २००३च्या वर्ल्ड कपची पुनरावृत्ती होतेय का अशी भीती मनात घर करून गेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 6:42 PM

Open in App

ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : २००३च्या वर्ल्ड कपची पुनरावृत्ती होतेय का अशी भीती मनात घर करून गेली आहे. जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियाने १५ धावा कुटल्या. २००३च्या फायनलमध्ये झहीर खानने पहिल्या षटकात एवढ्याच धावा दिल्या होत्या. पण, जसप्रीतच्या पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नरचा स्लीपमध्ये झेल उडाला होता. मात्र, विराट कोहली व शुबमन गिल एकमेकांकडे पाहत बसले अन् चेंडू दोघांच्या मधून चौकार गेला. रोहित शर्माने लगेल स्पर्धेतील यशस्वी गोलंदाज मोहम्मद शमीला आणले अन् त्याने धक्का दिला. वॉर्नरचा स्लीपमध्ये विराटने अफलातून झेल घेतला. 

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी वर्ल्ड कप फायनलचा पहिला टप्पा गाजवला. रोहित शर्माच्या ( ४७) आक्रमक सुरुवातीच्या जोरावर भारताने पहिल्या १० षटकांत २ बाद ८० धावा फलकावर चढवल्या होत्या. पण, शुबमन गिल ( ४) व श्रेयस अय्यर ( ४) हे अपयशी ठरले. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी डाव सावरला होता. या दोघांची १०९ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी पॅट कमिन्सने तोडली. विराट ५४ धावांवर आणि लोकेश ६६ धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजा ( ९), मोहम्मद शमी ( ६), सूर्यकुमार यादव ( १८),  जसप्रीत बुमराह ( १), कुलदीप यादव ( १०) व मोहम्मद सिराज ( नाबाद ९) यांनी थोडा हातभार लावला. ११ ते ४० षटकांत भारतीय फलंदाजांना केवळ ४ चौकार मारता आले. मिचेल स्टार्कने ३, तर जोश हेझलवूड व पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.  

भारतीय गोलंदाजांची आता खरी परीक्षा होती आणि जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नरचा स्लीपमध्ये झेल उडाला होता. पण, विराट कोहली व शुबमन गिल हे एकमेकांकडे पाहत राहिले आणि चेंडू त्यांच्या मधून सीमापार केला. हा विराटचा झेल होता, परंतु त्याने प्रयत्नच केला नाही. विराटला वाटलं गिल डाईव्ह मारेल अन् गिलला वाटलं विराट झेल घेईल. पण, तू की मी या नादात विकेट मिळाली नाही. मोहम्मद शमीने त्याच्या पहिल्या षटकात वॉर्नरला ( ७) बाद केले. यावेळी विराटने स्लीपमध्ये अप्रतिम झेल घेतला. 

 

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपविराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामोहम्मद शामी