ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमधील पहिल्या ३० षटकांचा खेळ पाहता ऑस्ट्रेलियाने यजमान भारतीयांचे टेंशन वाढवले आहे. फायनलमध्ये एकवेळ दक्षिण आफ्रिका चालली असता असाच सूर ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर उमटला होता आणि तो का याची प्रचिती आता येतेच... प्रतिस्पर्धी गोलंदाजांना चोपून काढणारी भारतीय फलंदाजी आज शांत दिसली. रोहित शर्माच्या आतषबाजीनंतर भारतीय फलंदाजांना चौकारासाठी ९७ चेंडूं खेळावी लागले. त्यात विराट कोहलीच्या विकेटने ( Virat Kohli) नरेंद्र मोदी स्टेडियमवरील चाहत्यांना गप्प केले.
विराट कोहलीची फिफ्टी, २ विश्वविक्रमांची नोंद! डेव्हिड बून, मियाँदाद यांच्या स्पेशल पंक्तित स्थान
रोहित शर्माने ( ४७) भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. पण, शुबमन गिल ( ४) व श्रेयस अय्यर ( ४) यांनी आज निराश केले. ट्रॅव्हिस हेडने परतीचा अविश्वसनीय झेल घेऊन रोहितला माघारी जाण्यास भाग पाडले. नरेंद्र मोदी स्टेडियम एकदम चिडीचूप झाले. ५ चेंडूंत २ विकेट्स गेल्याने भारताचा रन रेट थोडा खाली आला. पहिल्या पॉवरप्लेनंतर पुढील १५ षटकांत भारताला एकही चौकार मारता आला नाही. विराट व लोकेश राहुल यांनी टीम इंडियाचा डाव सावरला होता. या दोघांनी १०९ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी केली, परंतु पॅट कमिन्सची नजर लागली. त्याच्या स्लोव्हर बाऊन्सरील चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने टोलावलण्याच्या प्रयत्नात विराट त्रिफळाचीत झाला.
चेंडू विराटच्या बॅटला लागून यष्टींवर आदळला आणि स्टेडियमवर शांतता पसरली. अनुष्का शर्माही नाराज झाली. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने भारतीय चाहत्यांना गप्प करण्यात जो आनंद मिळेल, तो दुसरा कशात नसेल असे विधान केले होते. त्याने त्याचा शब्द खरा ठरवला. विराट ६३ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ५४ धावांवर बाद झाला. भारताला १४८ धावांवर चौथा धक्का बसला.
Web Title: ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : Pat Cummins really silenced the crowd, he dismisses Virat Kohli ( 54), Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.