वर्ल्ड कप गमावल्यानंतर रोहित शर्मा रडला; इमोशनल Video पाहून देश हळहळला

ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वन डे वर्ल्ड कप उंचावला..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 10:01 PM2023-11-19T22:01:19+5:302023-11-19T22:01:40+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : Rohit Sharma in tears after the loss in the final, Watch Video  | वर्ल्ड कप गमावल्यानंतर रोहित शर्मा रडला; इमोशनल Video पाहून देश हळहळला

वर्ल्ड कप गमावल्यानंतर रोहित शर्मा रडला; इमोशनल Video पाहून देश हळहळला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वन डे वर्ल्ड कप उंचावला.. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलमध्ये त्यांनी यजमान भारतावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर ऑस्ट्रेलियाने आज टीम इंडियापेक्षा खूपच वरचढ कामगिरी केली. त्यामुळे १० सामन्यांत अपराजित राहिलेला भारतीय संघ फायनलमध्ये हरला. ट्रॅव्हिस हेडने ( Travis Head) मॅच विनिंग शतकी खेळी केली आणि त्याला मार्नस लाबुशेनची ( Marnus Labuschagne) दमदार साथ मिळाली.  

World Cup Final : भारतीय संघाचे काहीच चुकले नाही, ऑस्ट्रेलिया आज फक्त त्यांच्यापेक्षा चांगले खेळले

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी वर्ल्ड कप फायनलचा पहिला टप्पा गाजवला. रोहित शर्माच्या ( ४७) आक्रमक सुरुवातीच्या जोरावर भारताने पहिल्या १० षटकांत २ बाद ८० धावा फलकावर चढवल्या होत्या. पण, शुबमन गिल ( ४) व श्रेयस अय्यर ( ४) हे अपयशी ठरले. विराट कोहली ( ५४) व लोकेश राहुल ( ६६) यांनी  १०९ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी केली. भारताचा संपूर्ण संघ २४० धावांत तंबूत परतला. प्रत्युत्तरात, मोहम्मद शमीने दुसऱ्या षटकात डेव्हिड वॉर्नरची ( ४) विकेट घेतली. पाठोपाठ जसप्रीत बुमराहने मिचेल मार्श ( १५) व स्टीव्ह स्मिथ ( ४) यांना बाद केले. पण, ट्रॅव्हिस हेड व मार्नस लाबुशेन ही जोडी खेळपट्टीवर शड्डू ठोकून उभी राहिली आणि भारताच्या हातून मॅच अलगद घेऊन गेली.   


विजयासाठी २ धावा हव्या असताना हेड बाद झाला. त्याने १२० चेंडूंत १५ चौकार व ४ षटकारांसह १३७ धावा केल्या. लाबुशेनसोबत त्याची २१४ चेंडूंवरील १९२ धावांची भागीदारी संपुष्टात आली. ग्लेन मॅक्सवलेने पहिल्याच चेंडूवर दोन धावा घेताना ऑस्ट्रेलियाचा ६ विकेट्सने विजय पक्का केला. लाबुशेन ११० चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ५८ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ बाद २४१ धावा केल्या आणि ६ विकेट्स व ४२ चेंडू राखून जेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियाने १९८७, १९९९, २००३, २००७, २०१५ व २०२३ असे सहा वर्ल्ड कप जिंकले.  

Web Title: ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : Rohit Sharma in tears after the loss in the final, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.