ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया का आली? ही चिंता आज भारतीय चाहत्यांना सतावतेय. वर्ल्ड कप स्पर्धेचे सर्वाधिक ५ जेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाने नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व गाजवले. नाणेफेक जिंकल्यावर पॅट कमिन्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् चाहते आनंदाने नाचू लागले. पहिल्या १० षटकापर्यंत सर्व ठिक होते, परंतु नंतर फासे पलटले. विराट कोहली व लोकेश राहुल यांच्या वैयक्तिक अर्धशतकांनी टीम इंडियाची लाज वाचवली आहे, परंतु आता भारतीय गोलंदाजांच्या खांद्यावर सर्व जबाबदारी आहे. ऑसींकडून मिचेल स्टार्कने ३, तर जोश हेझलवूड व पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
DRS चुकला अन् पुढच्या चेंडूवर तिच चूक करून जडेजा बाद झाला; ५ फलंदाज माघारी, Video
रोहित शर्माच्या ( ४७) आक्रमक सुरुवातीच्या जोरावर भारताने पहिल्या १० षटकांत २ बाद ८० धावा फलकावर चढवल्या होत्या. पण, शुबमन गिल ( ४) व श्रेयस अय्यर ( ४) हे अपयशी ठरले. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी डाव सावरला होता, परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्यांना दबावाखाली ठेवले होते. या दोघांना पहिला चौकार मिळवण्यासाठी ९७ चेंडू खेळावी लागली. या दोघांची १०९ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी पॅट कमिन्सने तोडली. त्याच्या स्लोव्हर बाऊन्सरील चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने टोलावलण्याच्या प्रयत्नात विराट त्रिफळाचीत झाला. विराट ६३ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ५४ धावांवर बाद झाला. भारताला १४८ धावांवर चौथा धक्का बसला. विराटने या वर्ल्ड कपमध्ये ११ सामन्यांत ९५.६२च्या सरसरीने ७६५ धावा कुटल्या.
स्टार्कने डावातील तिसरी विकेट घेताना मोहम्मद शमीला ( ६) माघारी पाठवले. अॅडम झम्पाने ८वा धक्का देताना जसप्रीत बुमराहला ( १) पायचीत केले. या विकेटसोबत त्याने या वर्ल्ड कपमध्ये शमीच्या २३ विकेट्सची बरोबरी केली. वर्ल्ड कपच्या एका आवृत्तीत सर्वाधिक २३ ( मुथय्या मुरलीधरन, २००७) याच्यानंतर झम्पा हा दुसरा फिरकीपटू ठरला. ऑस्ट्रेलियाची फिल्डींग नेहमीप्रमाणे अविश्वसनीय राहिली. सूर्या २८ चेंडूंत १८ धावांवर पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात हेझलवूडच्या चेंडूवर झेलबाद झाला. भारताने ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या.