विराट कोहलीची फिफ्टी, २ विश्वविक्रमांची नोंद! डेव्हिड बून, मियाँदाद यांच्या स्पेशल पंक्तित स्थान 

ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : रोहित शर्माने त्याची भूमिका चोख बजावताना भारताला आक्रमक सुरुवात करून दिली, परंतु ऑस्ट्रेलियाने चांगले पुनरागमन केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 04:03 PM2023-11-19T16:03:30+5:302023-11-19T16:03:52+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : Virat Kohli scored fifty, becomes the first player to complete 750 runs in a single edition of World Cup, he has now scored the most runs in major ICC (senior) tournament Finals | विराट कोहलीची फिफ्टी, २ विश्वविक्रमांची नोंद! डेव्हिड बून, मियाँदाद यांच्या स्पेशल पंक्तित स्थान 

विराट कोहलीची फिफ्टी, २ विश्वविक्रमांची नोंद! डेव्हिड बून, मियाँदाद यांच्या स्पेशल पंक्तित स्थान 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : रोहित शर्माने त्याची भूमिका चोख बजावताना भारताला आक्रमक सुरुवात करून दिली, परंतु ऑस्ट्रेलियाने चांगले पुनरागमन केले. रोहित, शुबमन गिल व श्रेयस अय्यर यांना माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड घेतली. पहिल्या १० षटकांत ८० धावा करणाऱ्या भारतीय संघाला पुढील १५ षटकांत केवळ ५० धावा करता आल्या. विराटने आज या स्पर्धेतील सलग पाचवी ५०+ धावांची खेळी साकारली. वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्धशतक झळकावणारा तो  चौथा भारतीय ठरला. विरेंद्र सेहवाग ( ८२ वि. ऑस्ट्रेलिया, २००३), गौतम गंभीर ( ९७ वि. श्रीलंका, २०११) आणि महेंद्रसिंग धोनी ( ९१* वि. श्रीलंका, २०११) यांनी ही कामगिरी केली होती. पण, विराटने आज दोन वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले.  

 सुरक्षा यंत्रणेला गंडवले! विराटला मिठी मारण्यासाठी चाहता मैदानावर, टी-शर्टवरील मॅसेजने वेधले लक्ष


रोहित शर्माने ( ४७) भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. शुबमन गिल ( ४) मात्र दडपणाला बळी पडला. रोहितने दुसऱ्या विकेटसाठी विराटसह ३२ चेंडूंत ४६ धावा जोडल्या. ग्लॅन मॅक्सवेलच्या पहिल्या षटकात सिक्स-फोअऱ मारल्यानंतर रोहित पुन्हा मोठा फटका मारेल हे मॅक्सीने हेरले अन् किंचित आखूड व वळणारा चेंडू टाकला. रोहितने पुढे येऊन फटका मारला अन् ट्रॅव्हिस हेडने परतीचा अविश्वसनीय झेल घेतला.  पॅट कमिन्सने भारताला आणखी एक धक्का देताना श्रेयस अय्यरला ( ४) झेलबाद केले. रोहितने या वर्ल्ड कपमध्ये ५९७ धावा करून भारतीय संघाच्या प्रवासात खूप महत्त्वाचा वाटा उचलला. पण, ५ चेंडूंत २ विकेट्स गेल्याने भारताचा रन रेट थोडा खाली आला. 

Image
पहिल्या पॉवरप्लेनंतर पुढील १५ षटकांत भारताला एकही चौकार मारता आला नाही. विराट व लोकेश राहुल यांनी टीम इंडियाचा डाव सावरला आहे आणि भारताने फलकावर शतकी धावा चढवल्या आहेत. या दोघांच्या संयमी खेळीने चाहत्यांना दिलासा दिला होता आणि त्यांच्या प्रत्येकी रनसाठी जल्लोष होत होता. विराटने या पर्वात ७५० हून अधिक धावा केल्या आणि वर्ल्ड कपच्या एका पर्वात ७५० हून अधिक धावा करणारा विराट जगातील पहिला फलंदाज ठरला. आयसीसी स्पर्धांच्या फायनलमध्ये सर्वाधिक ३२२* धावांचा विक्रमही विराटने नावावर करताना कुमार संगकाराला ( ३२०) मागे टाकले.  


वर्ल्ड कपच्या एकाच पर्वात उपांत्य फेरी व अंतिम फेरीत 50+ धावा करणारा विराट  सातवा फलंदाज ठरला. यापूर्वी माईक ब्रेअर्ली ( १९७९), डेव्हिड बून ( १९८७), जावेद मियाँदाद ( १९९२), अरविंद डी सिल्वा ( १९९६), ग्रँड एलिअट ( २०१५) आणि स्टीव्ह स्मिथ ( २०१५) यांनी असा पराक्रम केला आहे.  

Web Title: ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : Virat Kohli scored fifty, becomes the first player to complete 750 runs in a single edition of World Cup, he has now scored the most runs in major ICC (senior) tournament Finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.