ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : रोहित शर्माने त्याची भूमिका चोख बजावताना भारताला आक्रमक सुरुवात करून दिली, परंतु ऑस्ट्रेलियाने चांगले पुनरागमन केले. रोहित, शुबमन गिल व श्रेयस अय्यर यांना माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड घेतली. पहिल्या १० षटकांत ८० धावा करणाऱ्या भारतीय संघाला पुढील १५ षटकांत केवळ ५० धावा करता आल्या. विराटने आज या स्पर्धेतील सलग पाचवी ५०+ धावांची खेळी साकारली. वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्धशतक झळकावणारा तो चौथा भारतीय ठरला. विरेंद्र सेहवाग ( ८२ वि. ऑस्ट्रेलिया, २००३), गौतम गंभीर ( ९७ वि. श्रीलंका, २०११) आणि महेंद्रसिंग धोनी ( ९१* वि. श्रीलंका, २०११) यांनी ही कामगिरी केली होती. पण, विराटने आज दोन वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले.
सुरक्षा यंत्रणेला गंडवले! विराटला मिठी मारण्यासाठी चाहता मैदानावर, टी-शर्टवरील मॅसेजने वेधले लक्ष
रोहित शर्माने ( ४७) भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. शुबमन गिल ( ४) मात्र दडपणाला बळी पडला. रोहितने दुसऱ्या विकेटसाठी विराटसह ३२ चेंडूंत ४६ धावा जोडल्या. ग्लॅन मॅक्सवेलच्या पहिल्या षटकात सिक्स-फोअऱ मारल्यानंतर रोहित पुन्हा मोठा फटका मारेल हे मॅक्सीने हेरले अन् किंचित आखूड व वळणारा चेंडू टाकला. रोहितने पुढे येऊन फटका मारला अन् ट्रॅव्हिस हेडने परतीचा अविश्वसनीय झेल घेतला. पॅट कमिन्सने भारताला आणखी एक धक्का देताना श्रेयस अय्यरला ( ४) झेलबाद केले. रोहितने या वर्ल्ड कपमध्ये ५९७ धावा करून भारतीय संघाच्या प्रवासात खूप महत्त्वाचा वाटा उचलला. पण, ५ चेंडूंत २ विकेट्स गेल्याने भारताचा रन रेट थोडा खाली आला.