ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : नरेंद्र मोदी स्टेडियमवरील वातावरण टीव्हीवर पाहतानाही अंगावर काटा उभा राहिल असं आहे... मोहम्मद शमीने विकेटची बोहोनी करून दिल्यानंतर जसप्रीत बुमराहने मैदानावर आग लावली आहे. त्याच्या अप्रतिम चेंडूने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना गोंधळून टाकले. त्यात विराट कोहलीचं रांगडी सेलिब्रेशन प्रेक्षकांची एनर्जी वाडवणारा ठरतोय... विराटने मार्नस लाबुशेनची केलेली स्लेजिंग ऑसी फलंदाजावर दडपण टाकणारी ठरतेय. बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर वॉर्नरचा झेल सुटला, परंतु शमीने त्याचा ( ७) काटा काढला. जसप्रीतने नंतर मिचेल मार्श ( १५) व स्टीव्ह स्मिथ ( ४) यांना बाद करून ऑस्ट्रेलियाला ४७ धावांवर तिसरा धक्का बसला. स्मिथ DRS घेतला असता तर जसप्रीतला ही विकेट मिळाली नसती.
जसप्रीत बुमराहने मैदान गाजवले; स्टीव्ह स्मिथच्या विकेटचा रिप्ले पाहून ऑसींनी डोकं आपटले, Video
ट्रॅव्हिस हेड व मार्नस लाबुशेन यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण करताना ऑस्ट्रेलियाला २० षटकांत १०४ धावांपर्यंत पोहोचवले. दव पडण्यापूर्वी रोहितने दोन्ही फिरकीपटूंना गोलंदाजीला आणले आणि त्यांनी ऑसींच्या धावांवर अंकुश ठेवला होता. हेडने ५८ चेंडूंत या वर्ल्ड कपमधील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. २१.३ षटकांत भारताच्या ३ बाद १२० धावा होत्या आणि ऑस्ट्रेलियाने ३ बाद ११५ धावा केल्या. दरम्यान विराटचा काही दुसराच खेळ सुरू होता. तो लाबुशेनला टशन देत होता आणि स्लेजिंक करताना दिसला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी वर्ल्ड कप फायनलचा पहिला टप्पा गाजवला. रोहित शर्माच्या ( ४७) आक्रमक सुरुवातीच्या जोरावर भारताने पहिल्या १० षटकांत २ बाद ८० धावा फलकावर चढवल्या होत्या. पण, शुबमन गिल ( ४) व श्रेयस अय्यर ( ४) हे अपयशी ठरले. विराट कोहली ( ५४) व लोकेश राहुल ( ६६) यांनी १०९ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजा ( ९), मोहम्मद शमी ( ६), सूर्यकुमार यादव ( १८), जसप्रीत बुमराह ( १), कुलदीप यादव ( १०) व मोहम्मद सिराज ( नाबाद ९) यांनी थोडा हातभार लावला. ११ ते ४० षटकांत भारतीय फलंदाजांना केवळ ४ चौकार मारता आले. भारताचा संपूर्ण संघ २४० धावांत तंबूत परतला.