ND vs AUS Final mach updates | अहमदाबाद : वन डे विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्याची दरम्यान, सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. नेटकरी भारतीय टीमच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. संपूर्ण देश एकजुटीने भारतीय संघाला विजयासाठी शुभेच्छा देत आहे. या सामन्यासाठी आता सत्ताधारी पक्ष भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेसमध्येही एकजूट दिसून आली. सामन्याच्या विजयासाठी भाजपने एक ट्विट केले होते. यावर काँग्रेसने रिट्विट करत प्रत्युत्तर दिले. या ट्विटची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.
या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्स शेअर करायला सुरुवात केली आहे. भाजपने आपल्या सोशल मीडिया एक्स अकाउंटवरून पोस्ट केले, 'चला टीम इंडिया! आमचा तुमच्यावर विश्वास आहे", असं ट्विट केलं या ट्विटला रिट्विट करत काँग्रेसने लिहिले, 'खरंच सांगितलं! जितेगा इंडिया'. या ट्विटला आतापर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका यूजरने म्हटले की, 'काँग्रेस आणि भाजप पहिल्यांदा एकत्र आले आहेत आणि हे टीम इंडियासाठी आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले की, रामायण मालिकेतील भगवान राम आणि रावणाचा फोटो शेअर केला आणि लिहिले, 'जेव्हा भारतात येतो.' तिसऱ्या वापरकर्त्याने 'सौतन बनी सहेली.
शूsssss! पॅट कमिन्सनं त्याचा शब्द खरा केला, विराट कोहलीचा त्रिफळा उडवला, Video
दरम्यान, या सामन्याच्या विजयासाठी सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट करत टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने यजमान भारतीयांचे टेंशन वाढवले आहे. फायनलमध्ये एकवेळ दक्षिण आफ्रिका चालली असता असाच सूर ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर उमटला होता आणि तो का याची प्रचिती आता येतेच... प्रतिस्पर्धी गोलंदाजांना चोपून काढणारी भारतीय फलंदाजी आज शांत दिसली. रोहित शर्माच्या आतषबाजीनंतर भारतीय फलंदाजांना चौकारासाठी ९७ चेंडूं खेळावी लागले. त्यात विराट कोहलीच्या विकेटने ( Virat Kohli) नरेंद्र मोदी स्टेडियमवरील चाहत्यांना गप्प केले.
रोहित शर्माने ( ४७) भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. पण, शुबमन गिल ( ४) व श्रेयस अय्यर ( ४) यांनी आज निराश केले. ट्रॅव्हिस हेडने परतीचा अविश्वसनीय झेल घेऊन रोहितला माघारी जाण्यास भाग पाडले. नरेंद्र मोदी स्टेडियम एकदम चिडीचूप झाले. ५ चेंडूंत २ विकेट्स गेल्याने भारताचा रन रेट थोडा खाली आला. पहिल्या पॉवरप्लेनंतर पुढील १५ षटकांत भारताला एकही चौकार मारता आला नाही. विराट व लोकेश राहुल यांनी टीम इंडियाचा डाव सावरला होता. या दोघांनी १०९ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी केली, परंतु पॅट कमिन्सची नजर लागली. त्याच्या स्लोव्हर बाऊन्सरील चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने टोलावलण्याच्या प्रयत्नात विराट त्रिफळाचीत झाला.
Web Title: ICC ODI World Cup Final IND vs AUS Political beating on the occasion of World Cup! On BJP's tweet, Congress means, Jitega India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.