IND vs AFG Live : अफगाणिस्तानची विक्रमी कामगिरी; भारतीय गोलंदाजांच्या मेहनतीवर फिरवले पाणी

ICC ODI World Cup India vs Afghanistan Live : हशमतुल्लाह शाहिदी आणि आझमतुल्लाह ओमारझाई यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेताना तगडे लक्ष्य उभे केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 05:52 PM2023-10-11T17:52:25+5:302023-10-11T18:00:20+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs AFG Live : Azmatullah Omarzai ( 62) and Hashmatullah Shahidi ( 80), Afghanistan 272-8 (50 overs) | IND vs AFG Live : अफगाणिस्तानची विक्रमी कामगिरी; भारतीय गोलंदाजांच्या मेहनतीवर फिरवले पाणी

IND vs AFG Live : अफगाणिस्तानची विक्रमी कामगिरी; भारतीय गोलंदाजांच्या मेहनतीवर फिरवले पाणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup India vs Afghanistan Live : अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी आणि आझमतुल्लाह ओमारझाई यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेताना तगडे लक्ष्य उभे केले. ३ बाद ६३ अशी अफगाणिस्तानची अवस्था झाली होती. पण, शाहिदी व ओमारझाई यांच्या विक्रमी १२१ धावांनी सारे चक्र फिरवले. त्यामुळे अफगाणिस्तानच्या अन्य फलंदाजांचा आत्मविश्वास उंचावला अन् भारतासमोर धावांचा डोंगर उभा राहिला. जसप्रीत बुमराहने ३९ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्याने २ गडी बाद केले.

अफगाणिस्तानचा पलटवार, मोडला १३ वर्षांपूर्वीचा विक्रम; विकेट घेताच हार्दिकचे Wild सेलिब्रेशन, Video 


अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ७व्या षटकात बुमराहने इब्राहिम झाद्रानला ( २२)  बाद केले. १३व्या षटकात हार्दिक पांड्याने रहमनुल्लाह गुरबाजला ( २१) आणि पुढच्या षटकात शार्दूलने रहमत शाहला ( १६) माघारी पाठवले. ३ बाद ६३ अशा बिकट अवस्थेतून शाहिदी आणि ओमारझाई यांनी संघाला बाहेर काढले. दोघांनी  विक्रमी १२१ धावांची भागीदारी केली. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अफगाणिस्तानकडून दुसऱ्यांदाच शतकी भागीदारी झाली. हार्दिकने ही भागीदारी तोडताना ओमारझाईला ( ६२) त्रिफळाचीत केले. भारताविरुद्ध कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यातील ही अफगाणिस्तानकडून झालेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २०१०मध्ये ट्वेंटी-२०त अफघान व अली झाद्रान यांनी ६८ धावा जोडल्या होत्या. 



शाहिदी चांगला सेट झाला होता आणि क्रॅम्प येऊनही तो प्राथमिक उपचार घेऊन बारतीय गोलंदाजांचा समाचार घेताना दिसला. काल मोहम्मद रिझवानने क्रॅम्प येऊनही शतकी खेळी केली होती आणि आज शाहिदीला पाहून त्याची आठवण झाली. पण, कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर तो रिव्हर्स फटका मारण्याच्या प्रयत्नात फसला अन् पायचीत झाला. शाहिदीने ८८ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ८० धावा केल्या. मोहम्मद नबी १९ धावांवर बुमराहच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. कुलदीपने १० षटकांत ४० धावा देत १ विकेट घेतली. राशीद खानने ( १६) ट्वेंटी-२० क्रिकेटचा अनुभव अखेरच्या ५ षटकांत कामी आणला अन् संघाला ८ बाद २७२ धावांपर्यंत घेऊन गेला.

Web Title: ICC ODI World Cup IND vs AFG Live : Azmatullah Omarzai ( 62) and Hashmatullah Shahidi ( 80), Afghanistan 272-8 (50 overs)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.