IND vs AFG Live : 'लॉर्ड'चा डबल धमाल! शार्दूल ठाकूरने अफलातून झेल टिपला अन् तिसरा बळीही घेतला, Video  

ICC ODI World Cup India vs Afghanistan Live : आर अश्विनच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) आज कमाल केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 03:22 PM2023-10-11T15:22:30+5:302023-10-11T15:22:46+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs AFG Live : HARDIK PANDYA STRIKES! Good catch by Shardul Thakur near the boundary rope. Afghanistan losses Rahmanullah Gurbaz, AFG 63/3 (13.1)Video  | IND vs AFG Live : 'लॉर्ड'चा डबल धमाल! शार्दूल ठाकूरने अफलातून झेल टिपला अन् तिसरा बळीही घेतला, Video  

IND vs AFG Live : 'लॉर्ड'चा डबल धमाल! शार्दूल ठाकूरने अफलातून झेल टिपला अन् तिसरा बळीही घेतला, Video  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup India vs Afghanistan Live : आर अश्विनच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) आज कमाल केली. अफगाणिस्तानविरुद्धच्यावन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यात भारताने पकड घेतलेली पाहायला मिळतेय. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि शार्दूल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे. शार्दूलने विकेटसोबतच सीमारेषेवर घेतलेला अफलातून झेल चर्चेचा विषय ठरला आहे. त्याची ही कामगिरी पाहून रवींद्र जडेजाने त्याला मिठी मारली अन् त्याच्या गालही ओढले. हार्दिक व विराटनेही कौतुक केले. 

IND vs AFG Live : जसप्रीत बुमराहने सेलिब्रेशनची स्टाईल बदलली; स्टार खेळाडूची कॉपी मारली, Video 

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ७व्या षटकात त्यांना पहिला धक्काही बसला.  मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात सलामीवीर इब्राहिम झाद्रानसाठी DRS घेतला, परंतु तो वाया गेला. स्लीपमध्ये उभा असलेला विराट कोहली LBW असल्याचे दाव्याने म्हणत होता आणि रोहितने DRS घेतला. पण, रिप्लेत चेंडू स्टम्पवर आदळत नसल्याचे स्पष्ट झाले अन् भारताला रिव्ह्यू गमवावा लागला.  ७व्या षटकात जसप्रीत बुमराहने अफगाणिस्थानला पहिला धक्का दिला. इब्राहिम झाद्रान २२ धावांवर झेलबाद झाला. या विकेटनंतर जसप्रीतने इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू मार्कस रशफोर्ड याच्या सेलिब्रेशनच्या स्टाईल कॉपी केली.  


१३व्या षटकात हार्दिक पांड्याने भारताला यश मिळवून दिले. हार्दिकच्या बाऊन्सरवर रहमनुल्लाह गुरबाजने पूल शॉट मारला. पण, सीमारेषेवर उभ्या असलेल्या शार्दूलने सुरेख झेल टिपला. आपला तोल जातोय हे लक्षात येताच त्याने चेंडू पुन्हा हवेत फेकला अन् स्वतःला सावरून पुन्हा मैदानावर येत झेल घेतला. गुरबाज २८ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह २१ धावांवर बाद झाला. पुढच्याच षटकात शार्दूलने गोलंदाजीत कमाल केली आणि रहमत शाहला ( १६) पायचीत करून माघारी पाठवले. अफगाणिस्तानला ६३ धावांत तिसरा धक्का बसला.  



 

Web Title: ICC ODI World Cup IND vs AFG Live : HARDIK PANDYA STRIKES! Good catch by Shardul Thakur near the boundary rope. Afghanistan losses Rahmanullah Gurbaz, AFG 63/3 (13.1)Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.