ICC ODI World Cup India vs Afghanistan Live : झटपट ३ विकेट गेल्यानंतर अफगाणिस्तानने चांगले कमबॅक केले. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या हशमतुल्लाह शाहिदी आणि आझमतुल्लाह ओमारझाई यांनी वादळी खेळ केला. या दोघांनी भारताविरुद्ध संघाचा १२ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला. हार्दिक पांड्याने ही जोडी तोडून भारताला दिलासा दिला.
'लॉर्ड'चा डबल धमाल! शार्दूल ठाकूरने अफलातून झेल टिपला अन् तिसरा बळीही घेतला, Video
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ७व्या षटकात बुमराहने इब्राहिम झाद्रानला २२ धावांवर बाद केले. १३व्या षटकात हार्दिक पांड्याने भारताला यश मिळवून दिले. हार्दिकच्या बाऊन्सरवर रहमनुल्लाह गुरबाजने पूल शॉट मारला. पण, सीमारेषेवर उभ्या असलेल्या शार्दूलने सुरेख झेल टिपला. आपला तोल जातोय हे लक्षात येताच त्याने चेंडू पुन्हा हवेत फेकला अन् स्वतःला सावरून पुन्हा मैदानावर येत झेल घेतला. गुरबाज २८ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह २१ धावांवर बाद झाला. पुढच्याच षटकात शार्दूलने गोलंदाजीत कमाल केली आणि रहमत शाहला ( १६) पायचीत करून माघारी पाठवले.
हशमतुल्लाह शाहिदी आणि आझमतुल्लाह ओमारझाई यांनी अफगाणिस्ताचा डाव सावरताना १००+ धावांची भागीदारी केली. ही जोडी तोडण्यासाठी पुन्हा बुमराहला गोलंदाजीला आणले गेले. ओमारझाई आणि शाहिदी या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अफगाणिस्तानकडून दुसऱ्यांदाच शतकी भागीदारी झाली आहे. २०१९मध्ये इक्रम अलिखिल आणि रहमत शाह यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी १३३ धावा जोडल्या होत्या. शाहिदी आणि ओमारझाई यांची १२८ चेंडूंवरील १२१ धावांची भागीदारी हार्दिकने तोडली. ओमारझाई ६९ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ६२ धावांवर त्रिफळाचीत झाला.
भारताविरुद्ध कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यातील ही अफगाणिस्तानकडून झालेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २०१०मध्ये ट्वेंटी-२०त अफघान व अली झाद्रान यांनी ६८ धावा जोडल्या होत्या.
Web Title: ICC ODI World Cup IND vs AFG Live : Hardik Pandya's aggressive celebration, Azmatullah Omarzai & Hashmatullah Shahidi registered 2nd Highest partnerships for Afghanistan in World Cups (any wicket), Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.