ICC ODI World Cup India vs Afghanistan Live : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने आज नवी दिल्लीतील स्टेडियम दणाणून सोडले. त्याने ज्या पद्धतीने फटकेबाजी केली ते पाहून चाहते खूश झालेच, पण अफगाणिस्ताच्या गोलंदाजांना धडकी भरली. रोहितने आज वर्ल्ड कप स्पर्धेत वेगवान १००० धावा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार असे वर्ल्ड रेकॉर्ड मोडताना गोलंदाजांची अवस्था दयनीय केली. रोहितने वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक ६ शतकांचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.
रोहितने आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात जलद १००० धावांच्या भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर केला आणि जगातील फलंदाजांमध्ये त्याने संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले. रोहितने १९ इनिंग्जमध्ये हा पराक्रम करताना डेव्हिड वॉर्नरशी बरोबरी केली. पण, सचिन तेंडुलकर ( २०), एबी डिव्हिलियर्स आणि व्हिव्ह रिचर्ड्स यांचा विक्रम मोडला. वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आला आणि त्याने गांगुलीचा १००६ धावांचा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५५४* षटकारांचा विक्रमही रोहितने नावावर करताना ख्रिस गेलचा ५५३ षटकारांचा विक्रम मोडला.
रोहित आज कोणालाच जुमानत नव्हता आणि त्याने पूल शॉटने मारलेला षटकार सर्वांना अचंबित करणारा ठरला. लोकेश राहुल चेंडूकडे पाहतच राहिला. आयसीसी व्हाईट बॉल स्पर्धांमध्ये रोहितने ७०* षटकार खेचून एबीचा (६९) विक्रम मोडला. ख्रिस गेल १२७ षटकारांसह अव्वल स्थानी आहे. रोहितची फटकेबाजी पाहून इशानचाही मूड झाला अन् त्यानेही हात मोकळे केले. रोहितने ६३ चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारांसह १०० धावा केल्या. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील हे त्याचे ७वे शतक ठरले आणि असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला. भारताकडून वर्ल्ड कप स्पर्धेतील हे सर्वात वेगवान शतक ठरले.
Fastest century for India in ODI World Cups - where recorded:
Rohit Sharma - 63 vs AFG in 2023 (Delhi)
Virender Sehwag - 81 vs BER in 2007 (Port of Spain)
Virat Kohli - 83 vs BAN in 2011 (Mirpur)
Shikhar Dhawan - 84 vs IRE in 2015 (Hamilton)
Sachin Tendulkar - 84 vs KEN in 1999 (Bristol)
Web Title: ICC ODI World Cup IND vs AFG Live : Most century in WC, Rohit Sharma 7th century in WCs & fastest WC hundred by an Indian
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.