IND vs AFG Live : रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड; मोडला सचिन तेंडुलकर अन् सौरव गांगुलीचा वर्ल्ड कपमधील विक्रम

ICC ODI World Cup India vs Afghanistan Live : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 07:01 PM2023-10-11T19:01:31+5:302023-10-11T19:03:05+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs AFG Live : Rohit Sharma becomes the joint fastest in ICC Cricket World Cup history to reach 1,000 runs, break Sachin Tendulkar and Sourav Ganguly Record | IND vs AFG Live : रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड; मोडला सचिन तेंडुलकर अन् सौरव गांगुलीचा वर्ल्ड कपमधील विक्रम

IND vs AFG Live : रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड; मोडला सचिन तेंडुलकर अन् सौरव गांगुलीचा वर्ल्ड कपमधील विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup India vs Afghanistan Live : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. अफगाणिस्तानच्या २७२ धावांच्या प्रत्युत्तरात रोहितने आज आक्रमक पवित्रा अवलंबवला. इशान किशन सावध खेळ करताना दिसला. दिल्लीच्या या स्टेडियमवर २०१३नंतर आतापर्यंत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सहापैकी ५ सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतासमोर मोठं आव्हान होतं आणि ते रोहितने खांद्यावर उचलले. 

भारताला १९८२च्या पराक्रमाच्या पुनरावृत्तीची संधी, अफगाणिस्तानने उभी केलीय विक्रमांची 'दही हंडी'!


अफगाणिस्तानने आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध ८ बाद २७२ धावांचा डोंगर उभा केला आहे. ३ बाद ६३ अशी अफगाणिस्तानची अवस्था झाली होती, परंतु अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी ( ८०) आणि आझमतुल्लाह ओमारझाई ( ६२) यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. मोहम्मद सिराज हा आजच्या सामन्यात सर्वात महागडा गोलंदाज ठरला त्याने ९ षटकांत एकही विकेट न घेता ७६ धावा दिल्या. जसप्रीत बुमराहने ३९ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्याने २ गडी बाद केले. अफगाणिस्तानची वर्ल्ड कप स्पर्धेतील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. २०१९मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध लीड्स येथे २८८ धावा केल्या होत्या.  


नवी दिल्लीच्या स्टेडियमवर १९८२ मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध २७८ धावांचे यशस्वी लक्ष्य पार केले होते आणि ही सर्वोत्तम कामगिरी होती. ही कामगिरी वगळता २४०+ धावांच्या लक्ष्याचा इथे एकदाच यशस्वी पाठलाग झाला आहे. १९९६च्या वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेने भारताविरुद्ध २७२ धावांचे लक्ष्य पार केले होते. रोहितने आज  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात जलद १००० धावांच्या भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर केला आणि जगातील फलंदाजांमध्ये त्याने संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले.

रोहितने १९ इनिंग्जमध्ये हा पराक्रम करताना डेव्हिड वॉर्नरशी बरोबरी केली. पण, सचिन तेंडुलकर ( २०), एबी डिव्हिलियर्स आणि व्हिव्ह रिचर्ड्स यांचा विक्रम मोडला.  वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आला आणि त्याने गांगुलीचा १००६ धावांचा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५५४* षटकारांचा विक्रमही रोहितने नावावर करताना ख्रिस गेलचा ५५३ षटकारांचा विक्रम मोडला. 
 

Web Title: ICC ODI World Cup IND vs AFG Live : Rohit Sharma becomes the joint fastest in ICC Cricket World Cup history to reach 1,000 runs, break Sachin Tendulkar and Sourav Ganguly Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.