रोहित शर्माचे विक्रम
- वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक शतकं
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार
- वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक षटकार
- वन डेत पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय
- वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासाताली भारताकडून सर्वात वेगवान शतक
ICC ODI World Cup India vs Afghanistan Live : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) आजच्या खेळीची नोंद ही विश्वविक्रमी अशी नोंद होईल. त्याने ८४ चेंडूंत १६ चौकार व ५ उत्तुंग षटकारांच्या आतषबाजीसह १३१ धावा कुटल्या आणि त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले गेले. रोहित व इशान किशन यांनी १५६ धावांची सलामी देताना भारताच्या पाया मजबूत केला आणि त्यानंतर विराट कोहलीने घरच्या मैदानावर विजयी कळस चढवला. भारताने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आज अफगाणिस्ताचा पराभव करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
२१ चेंडूंत ९४ धावा! रोहित शर्माची राजधानीत हवा; लिहिला वर्ल्ड रेकॉर्ड्सचा अध्याय नवा, Video
अफगाणिस्तानने ८ बाद २७२ धावांचा डोंगर उभा केला होता. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी ( ८०) आणि आझमतुल्लाह ओमारझाई ( ६२) यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. मोहम्मद सिराज हा आजच्या सामन्यात सर्वात महागडा गोलंदाज ठरला त्याने ९ षटकांत एकही विकेट न घेता ७६ धावा दिल्या. जसप्रीत बुमराहने ३९ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्याने २ गडी बाद केले. अफगाणिस्तानची वर्ल्ड कप स्पर्धेतील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. २०१९मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध लीड्स येथे २८८ धावा केल्या होत्या.
फलंदाजीला मैदानावर उतरलेला रोहित शर्मा आज वेगळ्याच मूडमध्ये दिसला. त्याने जबरदस्त फटकेबाजी करून स्टेडियम दणाणून सोडले. वर्ल्ड कप स्पर्धेत वेगवान १००० धावा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं, असे अनेक वर्ल्ड रेकॉर्ड मोडताना त्याने गोलंदाजांची अवस्था दयनीय केली. त्याने ६३ चेंडूंत शतक झळकावले आणइ वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील भारताकडून सर्वात वेगवान शतक ठरले. कपिल देव यांनी १९८३मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ७२ चेंडूंत शतक झळकावले होते. राशीद खानने इशानला ४७ धावांवर झेलबाद केले. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताकडून झालेली ही पाचवी सर्वोत्तम भागीदारी ठरली.
रोहितने राशीदचा समाचार घेतला आणि ४,४,६ असे फटके खेचले. आयसीसीच्या व्हाईट बॉल स्पर्धेतील रोहितचे हे ८वे शतक ठरले आणि त्याने सौरव गांगुली, ख्रिस गेल व सचिन तेंडुलकर ( ७) यांचा विक्रम मोडला. राशीदने दुसरी विकेट मिळवली. रोहित ८४ चेंडूंत १६ चौकार व ५ षटकारांसह १३१ धावांवर बाद झाला. विराटसह त्याने ४९ धावा जोडल्या. विराट आणि श्रेयस अय्यर यांनी भारताचा विजय निश्चित केला. भारताने ३५ षटकांत २ बाद २७३ धावा करून ८ विकेट्स राखून मॅच जिंकली. विराटने ५६ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ५५ धावा केल्या. श्रेयस २५ धावांवर नाबाद राहिला.
Web Title: ICC ODI World Cup IND vs AFG Live : World record breaker ROHIT SHARMA scored 131 (84) runs with 16 fours and 5 sixes, India won by 8 wkts
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.