IND vs AUS Live : रवींद्र जडेजाला ३ विकेट्स; भन्नाट चेंडूने स्टीव्ह स्मिथच्या 'बेल्स' उडवल्या, विराटची रिॲक्शन पाहा, Video  

ICC ODI World Cup India vs Australia Live Marathi : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पकड घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 04:25 PM2023-10-08T16:25:46+5:302023-10-08T16:27:20+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs AUS Live Marathi : Ravindra Jadeja gets the BIG WICKET of Steve Smith, he had no answers to Jadeja, Australia 119/5 in 29.4 over, Video  | IND vs AUS Live : रवींद्र जडेजाला ३ विकेट्स; भन्नाट चेंडूने स्टीव्ह स्मिथच्या 'बेल्स' उडवल्या, विराटची रिॲक्शन पाहा, Video  

IND vs AUS Live : रवींद्र जडेजाला ३ विकेट्स; भन्नाट चेंडूने स्टीव्ह स्मिथच्या 'बेल्स' उडवल्या, विराटची रिॲक्शन पाहा, Video  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup India vs Australia Live Marathi : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पकड घेतली आहे. मिचेल मार्श भोपळ्यावर माघारी परतल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ऑसींचा डाव सावरला होता. पण, कुलदीप यादवने ही जोडी तोडली आणि त्यानंतर रवींद्र जडेजाने कमाल केली. जडेजाच्या भन्नाट चेंडूवर स्मिथचा त्रिफळा उडवला, तर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात मार्नस लाबुशेन झेलबाद झाला. लोकेश राहुलने अप्रतिम झेल घेतला. 

IND vs AUS Live : पकडलेsssss! KL Rahul ओरडला, कुलदीप यादवने भन्नाट झेल टिपला; वॉर्नर बाद झाला, Video

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.  तिसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहने मिचेल मार्शला बाद केले. विराटने पहिल्या स्लीपमध्ये भन्नाट झेल घेतला. डेव्हीड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी संयमी खेळ करताना डाव सावरला. वॉर्नरने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात जलद १००० धावा करण्याचा विक्रम नावावर केला. त्याने १९ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला. स्मिथ व वॉर्नर यांनी ६९ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला कुठे सावरले होते, तोच कुलदीप यादवने भागीदारी तोडली. कुलदीपच्या चेंडूवर वॉर्नरने सरळ फटका मारला, परंतु तो चेंडू कुलदीपच्या हातात सहज विसावला. वॉर्नर ५२ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ४१ धावांवर बाद झाला. ( IND vs AUS Live Scoreboard ) 


स्मिथ व मार्नस लाबुशेन जोडी सेट होऊ पाहतच होती की रवींद्र जडेजाने विकेट घेतली. जडेजाने टाकलेला चेंडू अप्रतिम वळला अन् स्मिथला काही कळण्याआधी बेल्स उडाल्या. स्मिथ ७१ चेंडूंत ५ चौकारांसह ४६ धावांवर माघारी परतला अन् लाबुशेनसह ३६ धावांची भागीदारी तुटली. जडेजाने वन डे क्रिकेटमध्ये फक्त दुसऱ्यांदा स्मिथची विकेट घेतली आहे. त्याच्या १८८ चेंडूंत स्मिथने २२२ धावा केल्या आहेत. जडेजाने त्याच्या पुढच्या षटकात लाबुशेनला ( २७)  आणि अॅलेक्स केरीला ( ०) बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला २९.३ षटकांत ११९ धावांवर पाचवा धक्का बसला आहे. 

Web Title: ICC ODI World Cup IND vs AUS Live Marathi : Ravindra Jadeja gets the BIG WICKET of Steve Smith, he had no answers to Jadeja, Australia 119/5 in 29.4 over, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.