Join us  

IND vs AUS Live : इशान किशन, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर 'Duck' ठरले; ऑस्ट्रेलियन गोलंदाज गरजले, Video 

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी कहर केला. भारताच्या तीन फलंदाजांना शून्यावर माघारी पाठवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 6:46 PM

Open in App

ICC ODI World Cup India vs  Australia Live Marathi : ऑस्ट्रेलियाला १९९ धावांवर रोखल्यानंतर भारतीय सलामीवीरच ही धावसंख्या पार करून देतील असे वाटले होते. पण, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी कहर केला. भारताच्या तीन फलंदाजांना शून्यावर माघारी पाठवले. इशान किशन, रोहित शर्मा व श्रेयस अय्यर हे खातंही न उघडता माघारी परतले. जोश हेझलवूडने एका षटकात दोन धक्के दिले. 

रवींद्र जडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. त्याने तीन धक्के दिल्यानंतर  कुलदीप यादव ( २-४२), आर अश्विन ( १-३४), जसप्रीत बुमराह ( २-३५), हार्दिक पांड्या ( १-२८) आणि मोहम्मद सिराज ( १-२६) यांनी उत्तम मारा केला.  डेव्हिड वॉर्नर ( ४१) आणि स्टीव्ह स्मिथ ( ४६) यांनी ६९ धावांची भागीदारी करून ऑसींचा डाव सावरला होता. पण, कुलदीपने  ही जोडी तोडली आणि त्यानंतर जडेजाने कमाल केली. मार्नस लाबुशेन ( २७) आणि मिचेल स्टार्क ( २८) यांनी हातभार लावला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४९.३ षटकांत १९९ धावांत ऑल आऊट झाला. 

वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक इकॉनॉमिक गोलंदाजी करण्यात जडेजाने चौथे स्थान पटकावले. १९८३च्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी २.० ( ८ षटकांत २ धावा दिलेल्या), त्यानंतर मदन लाल यांनी ८.२ षटकांत ४ बाद २० आणि बलविंदर सिंग  यांनी १० षटकांत ३ बाद २८ धावा दिल्या होत्या. आज जडेजाने २.८ च्या इकॉनॉमिने गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत ३ विकेट घेणारा जडेजा हा दुसरा भारतीय फिरकीपटू आहे.  मनिंदर सिंग यांनी १९८७मध्ये दिल्लीत ३४ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या. 

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माइशान किशनश्रेयस अय्यर