IND vs AUS Live : विराट कोहलीचे शतक हुकले! पठ्ठ्याने कांगारूंना रडवले, लोकेश राहुलसह मोठे विक्रम नोंदवले

ICC ODI World Cup India vs  Australia Live Marathi : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला सामना नाट्यमय राहिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 09:43 PM2023-10-08T21:43:01+5:302023-10-08T21:43:31+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs AUS Live Marathi : virat kohli (85) & KL Rahul registered Highest partnership for India against Australia in World Cup | IND vs AUS Live : विराट कोहलीचे शतक हुकले! पठ्ठ्याने कांगारूंना रडवले, लोकेश राहुलसह मोठे विक्रम नोंदवले

IND vs AUS Live : विराट कोहलीचे शतक हुकले! पठ्ठ्याने कांगारूंना रडवले, लोकेश राहुलसह मोठे विक्रम नोंदवले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup India vs  Australia Live Marathi : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला सामना नाट्यमय राहिला. रोहित शर्मा, इशान किशन व श्रेयस अय्यर हे खाते न उघडताच तंबूत परतले. सुरुवातीच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलिया बाजी मारेल असे वाटले होते.  पण, विराट कोहलीला १२ धावांवर जीवदान मिळाले आणि सारे चित्र बदलले. कोहली  ( Virat Kohli) आणि लोकेश राहुल यांनी ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर देताना विक्रमी भागीदारी केली. 

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाला झोडपले, दोन विश्वविक्रम नोंदवले; तेंडुलकरला मागे टाकले


ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १९९ धावांत तंबूत पाठवल्यानंतर भारताला सहज विजय मिळेल, असे वाटलेले. भारताची अवस्था ३ बाद २ धावा अशी झाली. विराट व लोकेश यांनी संयम दाखवला. विराटचा झेल सोडण्याची मिचेल मार्शची ती चूक ऑस्ट्रेलियाला पुढे महागात पडली. विराट व लोकेश यांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावताना चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. विराटने आजच्या खेळीत आयसीसीच्या व्हाईट बॉल स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रमही नावावर नोंदवला. वन डे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा अन् सर्वाधिक ११३ फिफ्टी+ धावांचा विक्रम आता विराटच्या नावावर नोंदवला गेला आहे.

Image
वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावांच्या भागीदारीचा विक्रम विराट-लोकेश यांनी नावावर केला. अजय जडेजा व आरपी सिंग यांनी १९९९मध्ये ओव्हल येथे १४१ आणि शिखर धवन व रोहित शर्मा यांनी २०१९मध्ये ओव्हल येथेच १२७ धावांची भागीदारी केली होती. विराट-लोकेशने आज २१५ चेंडूंत १६५ धावा जोडून जडेजा व  सिंगचा विक्रम मोडला. हेझलवूडच्या चेंडूवर पूल शॉट मारण्याच्या प्रयत्नात विराट बाद झाला. त्याने ११६ चेंडूंत ६ चौकारांसह ८५ धावा केल्या. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून विराटचे कौतुक केले. वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी सर्वोत्तम भागीदारी आता भारतीय जोडीच्या नावावर नोंदवली गेलीय. १९९६मध्ये न्यूझीलंडच्या एल जेर्मन आणि क्रिस हॅरीस यांनी १६८ धावा जोडल्या होत्या. विराट-लोकेशने आज २००७मध्ये एबी डिव्हिलयर्स व ग्रॅमी स्मिथ यांचा १६० धावांचा विक्रम मोडला.


 

Web Title: ICC ODI World Cup IND vs AUS Live Marathi : virat kohli (85) & KL Rahul registered Highest partnership for India against Australia in World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.