IND vs AUS Live : विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाला झोडपले, दोन विश्वविक्रम नोंदवले; तेंडुलकरला मागे टाकले

ICC ODI World Cup India vs  Australia Live Marathi : सुरुवातीच्या धक्क्यानंतर भारतीय संघाचा डाव सावरला आहे.विराट कोहलीने अर्धशतक झळकावून दोन वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 08:30 PM2023-10-08T20:30:14+5:302023-10-08T20:30:31+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs AUS Live Marathi : Virat Kohli fifty, he becomes the leading run getter in ICC white ball ( WC + CT + T20WC) tournaments for India.   | IND vs AUS Live : विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाला झोडपले, दोन विश्वविक्रम नोंदवले; तेंडुलकरला मागे टाकले

IND vs AUS Live : विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाला झोडपले, दोन विश्वविक्रम नोंदवले; तेंडुलकरला मागे टाकले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup India vs  Australia Live Marathi : सुरुवातीच्या धक्क्यानंतर भारतीय संघाचा डाव सावरला आहे. रोहित शर्मा, इशान किशन व श्रेयस अय्यर हे खाते न उघडताच तंबूत परतले. पण, विराट कोहली  ( Virat Kohli) आणि लोकेश राहुल यांनी ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर दिले. विराटने आज दोन विश्वविक्रम नोंदवले.


ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताच्या तीन फलंदाजांना शून्यावर माघारी पाठवले. मिचेल स्टार्कच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात इशान ( ०) स्लीपमध्ये झेल देऊन परतला. त्यानंतर हेझलवूडने रोहितला ( ०) पायचीत केले. श्रेयसने (०) सावध खेळ करणे अपेक्षित होते, परंतु त्याने कव्हरच्या दिशेने फटका मारला अन् डेव्हिड वॉर्नरने तो टिपला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे दोन्ही सलामीवीर भोपळ्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ ठरली. यापूर्वी १९८३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध सुनील गावस्कर व क्रिष्णमचारी श्रीकांत शून्यावर बाद झाले होते. भारताचे आघाडीचे तीन फलंदाज शून्यावर बाद होण्याची ही वन डेतील पहिलीच वेळ आहे. 



जोश हेझलवूडच्या बाऊन्सरवर विराटचा जागच्याजागी झेल उडाला होता. मिचेल मार्श व अॅलेक्स केरी दोघंही झेल घ्यायला पळाले. पण, मार्शकडून झेल सुटला अन् चाहत्यांनी सुटकेचा श्वास टाकला. विराटने आयसीसीच्या व्हाईट बॉल स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. त्याने ६४ इनिंग्जमध्ये २७२०+ धावा केल्या आहेत आणि सचिन तेंडुलकरचा २७१९ ( ५८ इनिंग्ज) विक्रम मोडला. रोहित शर्मा ( २४२२), युवराज सिंग ( १७०७), सौरव गांगुली ( १६७१) आणि महेंद्रसिंग धोनी ( १४९२) हे या विक्रमात नंतरच्या क्रमांकावर येतात. वन डे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर ११ हजार धावा करणारा विराट हा आशियातील पहिला फलंदाज ठरला.  
 

Web Title: ICC ODI World Cup IND vs AUS Live Marathi : Virat Kohli fifty, he becomes the leading run getter in ICC white ball ( WC + CT + T20WC) tournaments for India.  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.