ICC ODI World Cup IND vs ENG Live : ३ बाद ४० अशा दयनीय अवस्थेतून रोहित शर्मा व लोकेश राहुल या जोडीने टीम इंडियाला सावरले आहे. इंग्लंडविरुद्धच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या सामन्यात भारताला काही खास सुरुवात करता आली नाही. कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) संयमी खेळ करताना अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार म्हणून हा त्याचा १०० वा सामना आहे आणि त्यात त्याने मोठा पराक्रम नोंदवला. भारताकडून कर्णधार म्हणून सर्वाधिक ३३२ सामने महेंद्रसिंग धोनीने खेळले आहेत. त्यापाठोपाठ मोहम्मद अझरुद्दीन ( २२१), विराट कोहली ( २१३), सौरव गांगुली ( १९५), कपिल देव ( १०८), राहुल द्रविड ( १०४) व रोहित ( १००) असा क्रमांक येतो.
विराट कोहलीची सचिनच्या नकोशा विक्रमाशी बरोबरी, इंग्लंडच्या बार्मी आर्मीने मर्यादा ओलांडली
इंग्लंडने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आतापर्यंत अपयशी ठरलेल्या इंग्लंडचा खेळ भारताविरुद्ध उंचावलेला पाहायला मिळाला. तगडे लक्ष्य उभं करण्याचं दडपण घेऊन भारतीय फलंदाज मैदानावर उतरले आण ख्रिस वोक्सने चौथ्या षटकात अप्रतिम चेंडूवर शुबमन गिलचा ( ९) त्रिफळा उडवला. इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांनी अप्रतिम कामगिरी करून विराट कोहलीवरील दडपण वाढवले. त्यामुळे विराटकडून ( ०) चुकीचा फटका खेळला गेला आणि डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर मिड ऑफला बेन स्टोक्सने सहज झेल घेतला. रोहित शर्मा डिफेन्सीव्ह मोडमध्ये गेला. श्रेयस अय्यरने पुन्हा निराश केले आणि वोक्सच्या बाऊन्सरवर अय्यर ( ४) पुल मारायला गेला अन् चेंडू मिड ऑनला उभ्या असलेल्या मार्क वूडच्या हाती सहज विसावला.