ICC ODI World Cup IND vs ENG Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आज इंग्लंडविरुद्ध यजमान भारताची सुरूवात काही खास झालेली नाही. शुबमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे माघारी परतले आहेत. विराट शून्यावर बाद झाल्याने इंग्लंडच्या बार्मी आर्मीने विराटला बेक्कार ट्रोल केले.
इंग्लंडने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आतापर्यंत अपयशी ठरलेल्या इंग्लंडचा खेळ भारताविरुद्ध उंचावलेला पाहायला मिळाला. तगडे लक्ष्य उभं करण्याचं दडपण घेऊन भारतीय फलंदाज मैदानावर उतरले आण ख्रिस वोक्सने चौथ्या षटकात अप्रतिम चेंडूवर शुबमन गिलचा ( ९) त्रिफळा उडवला. विराट कोहली मैदानावर येताच एकच जल्लोष झाला, परंतु त्याला ८ चेंडूंत एकही धाव इंग्लंडच्या गोलंदाजांनी करू दिली नाही. इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांनी अप्रतिम कामगिरी करून विराटवरील दडपण वाढवले. त्यामुळे विराटकडून चुकीचा फटका खेळला गेला आणि डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर मिड ऑफला बेन स्टोक्सने सहज झेल घेतला. विराट भोपळ्यावर माघारी परतला. वर्ल्ड कप स्पर्धेत ( वन डे व ट्वेंटी-२०) विराट प्रथमच भोपळ्यावर माघारी परतला. दोन विकेट्स पडल्यामुळे रोहित शर्मा डिफेन्सीव्ह मोडमध्ये गेला. आज श्रेयस अय्यरला स्वतःला सिद्ध करण्याची पुरेशी संधी मिळाली आहे. पण, त्याने निराश केले. वोक्सच्या बाऊन्सरवर अय्यर ( ४) पुल मारायला गेला अन् चेंडू मिड ऑनला उभ्या असलेल्या मार्क वूडच्या हाती सहज विसावला. विराट वन डे क्रिकेटमध्ये २४ इनिंग्जनंतर प्रथमच भोपळ्यावर बाद झाला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये अहमदाबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्ध तो शून्यावर बाद झाला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटने सचिन तेंडुलकरच्या ( ३४) शून्यावर बाद होण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.