Join us  

भारताची कमकुवत बाजू समोर आली; रोहित शर्मा, सूर्यकुमार, KL Rahul यांनी लाज वाचवली

ICC ODI World Cup IND vs ENG Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग पाच विजयानंतर अखेर भारतीय संघाची कमकुवत बाजू समोर आली...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 5:53 PM

Open in App

ICC ODI World Cup IND vs ENG Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग पाच विजयानंतर अखेर भारतीय संघाची कमकुवत बाजू समोर आली... भारताने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाचही विजय धावांचा पाठलाग करून मिळवले होते, परंतु आज त्यांना इंग्लंडने प्रथम फलंदाजीला बोलावले. कर्णधार रोहित शर्माने ३ बाद ४० वरून लोकेश राहुलला सोबतीला घेत भारताचा डाव सावरला. पण, रोहित बाद झाला अन् पुन्हा किल्ला गडगडला... सूर्यकुमार यादवने उपयुक्त खेळी करून भारताला मोठा पल्ला गाठून देण्याचा प्रयत्न केला, परंतु तोही अपयशी ठरला. इंग्लंडच्या गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय झाली. 

Big Breaking : पाकिस्तानात २०२५ ला होणाऱ्या स्पर्धेतून इंग्लंड बाद होणार? तर टीम इंडियाला... 

शुबमन गिल ( ९), विराट कोहली ( ०) आणि श्रेयस अय्यर ( ४) माघारी परतल्याने भारताची अवस्था ३ बाद ४० अशी झाली होती. रोहित शर्मालोकेश राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी दमदार भागीदारी करताना इंग्लंडच्या पार्ट टाईम गोलंदाजांना चोपले. १११ चेंडूंत ९१ धावांची भागीदारी ३१व्या षटकात डेव्हिड विलीने संपुष्टात आणली. लोकेश ५८ चेंडूंत ३८ धावांवर झेलबाद झाला. रोहितसह सूर्यकुमार यादवने ३३ धावांची भागीदारी केली होती आणि ही जोडी तोडण्यासाठी इंग्लंडने अनुभवी गोलंदाज आदील राशीदला बोलावले. त्याच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित झेलबाद झाला. लिएम लिव्हिंगस्टोनने सुरेख झेल घेतला, परंतु त्याचा गुडघा मैदानावर जोरात आदळला. त्याला दुखापत झाली. रोहितने १०१ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८७ धावा केल्या.  

रवींद्र जडेजा ८ धावांवर माघारी परतल्याने भारताची अडचण वाढली, राशीदने त्याला पायचीत पकडले. मार्क वूडने पुढील षटकात मोहम्मद शमीला ( १) बाद करून भारताला सातवा धक्का दिला. सूर्यकुमारवर आता तळाच्या गोलंदाजांनासोबत घेऊन भारतीय संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून देण्याची जबाबदारी होती. तो ४७ चेंडूंत ४९ धावांवर बाद झाला. जसप्रीत बुमराहने ( १६) चांगला खेळ करताना संघाला ९ बाद २२९ धावांपर्यंत पोहोचवले.  डेव्हिड विलीने ३, तर ख्रिस वोक्स व आदील राशीद यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्मासूर्यकुमार अशोक यादवलोकेश राहुल