१३ चेंडूंत ५८ धावा! रोहित शर्माचे शतक हुकले, झेल घेणाऱ्या लिव्हिंगस्टोनचा गुडघा दुखावला, Video 

ICC ODI World Cup IND vs ENG Live : ३ बाद ४० अशा दयनीय अवस्थेतून रोहित शर्मा व लोकेश राहुल या जोडीने टीम इंडियाला सावरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 05:03 PM2023-10-29T17:03:04+5:302023-10-29T17:03:17+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs ENG Live : ROHIT SHARMA scored 87 runs (101) with 10 fours and 3 sixes,but has Livingstone landed badly on his right knee, India 164/5, Video  | १३ चेंडूंत ५८ धावा! रोहित शर्माचे शतक हुकले, झेल घेणाऱ्या लिव्हिंगस्टोनचा गुडघा दुखावला, Video 

१३ चेंडूंत ५८ धावा! रोहित शर्माचे शतक हुकले, झेल घेणाऱ्या लिव्हिंगस्टोनचा गुडघा दुखावला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup IND vs ENG Live : ३ बाद ४० अशा दयनीय अवस्थेतून रोहित शर्मा व लोकेश राहुल या जोडीने टीम इंडियाला सावरले. कर्णधार रोहितने ( Rohit Sharma) पुन्हा एकदा दमदार कामगिरी करून दाखवली, परंतु त्याचे शतक १३ धावांनी हुकले.  वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका पर्वात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये रोहितने ३९८ ( २०२३) धावांसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. सौरव गांगुलीने २००३ मध्ये ४६५ धावा, विराट कोहलीने २०१९मध्ये ४४३ धावा केल्या होत्या. रोहितने आज मोहम्मद अझरुद्दीनचा १९९२ सालचा ३३२ धावांचा विक्रम मोडला. कपिल देव यांनी १९८३ मध्ये ३०३ धावा केल्या होत्या.

 
भारताला चौथ्या षटकात ख्रिस वोक्सने धक्का दिला आणि अप्रतिम चेंडूवर शुबमन गिलचा ( ९) त्रिफळा उडवला. विराट कोहलीही शून्यावर डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर मिड ऑफला बेन स्टोक्सच्या हाती झेल देऊन परतला. रोहित शर्माने संयमी खेळ केला होता, परंतु  श्रेयस अय्यर ( ४) पुन्हा अपयशी ठरला.  वोक्सच्या चेंडूवर पुल मारण्याच्या प्रयत्नात तो मिड ऑनला मार्क वूडच्या हाती सहज झेल देऊन परतला.  रोहितने ६६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८००० धावांचा टप्पाही ओलांडला. वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक वेळा ५०+ धावा करणआऱ्या फलंदाजांमध्ये रोहितने ( १२) संयुक्तपणे विराटसह दुसरे स्थान पटकावले. सचिन तेंडुलकर ( २१) अव्वल स्थानी आहे.  

एकाच वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिव वेळा ५०+ धावा करणाऱ्या कर्णधारांमध्ये रोहितने ( ३) सौरव गांगुलीशई ( २००३) बरोबरी केली. विराट कोहली ( ५), मोहम्मद अझरुद्दीन ( ४) हे आघाडीवर आहेत आणि महेंद्रसिंग धोनी ( २) पाचव्या क्रमांकावर आहेत. रोहित व लोकेश यांनी चौथ्या विकेटसाठी दमदार भागीदारी करताना इंग्लंडच्या पार्ट टाईम गोलंदाजांना टार्गेट करून फटकेबाजी केली. १११ चेंडूंत ९१ धावांची भागीदारी ३१व्या षटकात विलीने संपुष्टात आणली. लोकेश ५८ चेंडूंत ३८ धावांवर झेलबाद झाला. रोहितसह सूर्यकुमार यादवने ३३ धावांची भागीदारी केली होती आणि ही जोडी तोडण्यासाठी इंग्लंडने अनुभवी गोलंदाज आदील राशीदला बोलावले. त्याच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित झेलबाद झाला. लिएम लिव्हिंगस्टोनने सुरेख झेल घेतला, परंतु त्याचा गुडघा मैदानावर जोरात आदळला. त्याला दुखापत झाली. रोहितने १०१ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८७ धावा केल्या.  

 


 

Web Title: ICC ODI World Cup IND vs ENG Live : ROHIT SHARMA scored 87 runs (101) with 10 fours and 3 sixes,but has Livingstone landed badly on his right knee, India 164/5, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.