Join us  

रोहित, विराट, शुबमन, श्रेयस यांचा एकत्रित वर्ल्ड रेकॉर्ड; ४८ वर्षांत जो कधीच झाला नव्हता

ICC ODI World Cup IND vs NED Live : उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना करण्यापूर्वी भारतीय फलंदाजांची परफेक्ट प्रॅक्टीस आज झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 4:48 PM

Open in App

ICC ODI World Cup IND vs NED Live : उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना करण्यापूर्वी भारतीय फलंदाजांची परफेक्ट प्रॅक्टीस आज झाली. नेदरलँड्सविरुद्धच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहलीश्रेयस अय्यर या पहिल्या चार फलंदाजांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून विश्वविक्रम रचला. 

सचिनच्या विक्रमाशी बरोबरी अन् विराट कोहलीचा त्रिफळा उडाला! अनुष्काचा चेहरा पडला, Video 

रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने १०० धावा जोडल्या आणि या वर्षातील ही त्यांची पाचवी शतकी भागीदारी ठरली. शुबमन ३१ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांच्या ५१ धावांवर बाद झाला, तर रोहितने ५४ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. विराटने त्यानंतर श्रेयस अय्यरसोबत भारताचा डाव सावरला आणि ६६ चेंडूंत ७१ धावा जोडल्या. ५६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५१ धावांवर कोहली त्रिफळाचीत झाला. रोएलॉफ व्हॅन डेर मर्वने त्याचा त्रिफळा उडवला.  वर्ल्ड कपमध्ये विराट दुसऱ्यांचा फिरकीपटूच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. २०१५मध्ये सिकंदर रझाने त्याची दांडी गुल केली होती.  

श्रेयसने हात मोकळे करताना अर्धशतक पूर्ण केले आणि वन डे क्रिकेटमध्ये भारताकडून आघाडीच्या चार फलंदाजांनी पन्नास प्लस धावा करण्याची ही पाचवी वेळ ठरली. यापूर्वी २००६ ( वि. इंग्लंड), २००७ ( वि. इंग्लंड), २०१७ ( वि. पाकिस्तान), २०२३ ( वि. पाकिस्तान) यांच्याविरुद्ध अशी कामगिरी झाली आहे. पण, वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात असे प्रथमच घडले.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपविराट कोहलीरोहित शर्माशुभमन गिलश्रेयस अय्यर