रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! डिव्हिलियर्स, गांगुलीचा मोडला विक्रम; एका खेळीतून अनेक पराक्रम

रोहित शर्माने आक्रमक अंदाजात टीम इंडियाला सुरुवात करून दिली. शुबमन गिलनेही उत्तुंग षटकार खेचून ऑरेंज आर्मीला हतबल केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 02:40 PM2023-11-12T14:40:29+5:302023-11-12T14:41:24+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs NED Live : Captain Rohit Sharma now holds the record for the most ODI sixes in the calendar year, He has completed 14,000 runs in international cricket as an opener   | रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! डिव्हिलियर्स, गांगुलीचा मोडला विक्रम; एका खेळीतून अनेक पराक्रम

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! डिव्हिलियर्स, गांगुलीचा मोडला विक्रम; एका खेळीतून अनेक पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup IND vs NED Live :  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ.. टीम इंडियाने आज अखेरच्या साखळी सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माने आक्रमक अंदाजात टीम इंडियाला सुरुवात करून दिली. शुबमन गिलनेही उत्तुंग षटकार खेचून ऑरेंज आर्मीला हतबल केले. रोहित मनगटांचा चांगला वापर करून मैदानाच्या सर्व बाजूंना चौकार जोडत होता. ७व्या षटकात त्याने पहिला षटकार खेचला अन् वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. 


वन डे वर्ल्ड कपच्या एका आवृत्तीत भारतीय कर्णधाराने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर आहे. त्याने २००३ मध्ये ११ सामन्यांत ४६५ धावा केल्या होत्या. रोहितच्या नावावर ४४२ धावा असून गांगुलीला मागे टाकण्यासाठी त्याला आणखी २४ धावांची गरज होती आणि त्याने तोही विक्रम मोडला. 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सलामीवीर म्हणून १४ हजार धावांचा टप्पाही त्याने आज ओलांडला.  
15758 - वीरेंद्र सेहवाग 
15335 -  सचिन तेंडुलकर 
14005 - रोहित शर्मा 
12258 - सुनील गावस्कर  
10867 - शिखर धवन 


वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वाधिक २३ षटकारांचा विक्रमही रोहितने या वर्ल्ड कपमध्ये नोंदवला आणि २०१९मध्ये इयॉन मॉर्गनचा २२ षटकारांचा विक्रम त्याने मोडला.  रोहितने २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या २४ वन डे सामन्यांमध्ये एकूण ५८ षटकार मारले आहेत आणि आजच्या सामन्यात त्याने १ षटकार खेचून  एका कॅलेंडर वर्षात वन डेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर केला. त्याने एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला. एबीनने २०१५ मध्ये २० वन डेमध्ये ५८ षटकार मारले होते आणि रोहितने २०२३ मध्ये ५८ षटकार खेचले आहेत.  Image
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.


नेदरलँड्स - मॅक्स ओ’डाऊड, वेस्ली बेरेसी, कॉलिन एकरमन, एस. एंगलब्रेच, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/यष्टीरक्षक), बास डी लीडे, तेजा निदामनुरू, लोगन वॅन बीक, रोल्फ वॅन डर मोर्वे,  आर्यन दत्त, पॉल वॅन मीकरेन.  
 

Web Title: ICC ODI World Cup IND vs NED Live : Captain Rohit Sharma now holds the record for the most ODI sixes in the calendar year, He has completed 14,000 runs in international cricket as an opener  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.