भारताने फोडले World Record ब्रेकिंग फटाके! श्रेयस, लोकेशचे शतक अन् ४१० धावांचा डोंगर

ICC ODI World Cup IND vs NED Live : भारतीय फलंदाजांचा आज उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वी परफेक्ट सराव झाला..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 05:44 PM2023-11-12T17:44:20+5:302023-11-12T17:47:06+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs NED Live : India's Top 5 scored fifties+ in this match, first time happened in World Cup, HUNDRED BY SHREYAS IYER & KL Rahul, India 410/4 | भारताने फोडले World Record ब्रेकिंग फटाके! श्रेयस, लोकेशचे शतक अन् ४१० धावांचा डोंगर

भारताने फोडले World Record ब्रेकिंग फटाके! श्रेयस, लोकेशचे शतक अन् ४१० धावांचा डोंगर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup IND vs NED Live : भारतीय फलंदाजांचा आज उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वी परफेक्ट सराव झाला.. नेदरलँड्सच्या गोलंदाजांना आज बंगळुरूत चांगला मार बसला. रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर व लोकेश राहुल यांनी फिफ्टी प्लस धावा केल्या. श्रेयसने त्याच्या अर्धशतकाचे शतकात रुपांतर केले आणि वर्ल्ड कपमधील हे त्याचे पहिले शतक ठरले. पाठोपाठ लोकेशनेही शतक पूर्ण केले आणि टीम इंडियाला चारशेपार पोहोचवले. 

रोहित, विराट, शुबमन, श्रेयस यांचा एकत्रित वर्ल्ड रेकॉर्ड; ४८ वर्षांत जो कधीच झाला नव्हता


भारतीय संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना करायचा आहे. अर्थात मायदेशातील वर्ल्ड कपमध्ये भारताने सलग ८ सामने जिंकून दबदबा कायम राखला आहे. आजही नेदरलँड्सविरुद्ध ही मालिका कायम राखतील असेच चित्र आहेत. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी टीम इंडियाला आज नेहमीप्रमाणे दमदार सुरुवात करून दिली. दोघांची १०० धावांची भागीदारी १२व्या षटकात शुबमनच्या ( ५१) विकेटने तुटली. रोहितने तुफान फटकेबाजी करून अनेक विक्रम आज मोडले, परंतु त्याच्या खेळीला ६१ धावांवर ब्रेक लागला. विराट कोहली व श्रेयस यांच्या ७१ धावांच्या खेळीने डाव सावरला, परंतु नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी सरासरी खाली आणली होती. 

Image
५१ धावांवर विराटचा त्रिफळा उडाला आणि बंगळुरूचे स्टेडियम शांत झाले. मात्र, श्रेयसच्या आतषबाजीने ते पुन्हा दणाणले. श्रेयस व लोकेश राहुल यांनीही चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. लोकेशनेही ४० चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि वन डे क्रिकेटमध्ये आघाडीच्या पाच फलंदाजांनी फिफ्टी प्लस धावा करण्याची ही तिसरी वेळ ठरली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने दोनवेळा भारताविरुद्ध असा पराक्रम केला होता. श्रेयसने ८४ चेंडूंत वर्ल्ड कपमधील त्याचे पहिले शतक पूर्ण केले. 

Image
वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर शतक झळकावणारा तो पाचवा भारतीय ठरला. सचिन तेंडुलकर ( १४०* वि. केनिया, १९९९), युवराज सिंग ( ११३ वि. वेस्ट इंडिज, २०११), श्रेयस ( १०१* वि. नेदरलँड्स, २०२३), अजय जडेजा ( १००* वि. ऑस्ट्रेलिया) आणि विराट कोहली ( १००* वि. बांगलादेश, २०११) यांनी हा पराक्रम केला होता. लोकेशनेही मग फटकेबाजी करताना शतकाच्या दिशेने वाटचाल केली. श्रेयसने ४९व्या षटकात श्रेयसने २५ धावा कुटल्या. लोकेशने ५०व्या षटकाची सुरुवात षटकाराने केली आणि पुन्हा षटका खेचून ६२ चेंडूंत शतक झळकावले. त्याचेही ही वर्ल्ड कपमधील पहिले शतक ठरले. तो ६४ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह १०२ धावांवर बाद झाला आणि श्रेयससह त्याची २०८ ( १२८ चेंडू) धावांची भागीदारी तुटली. श्रेयस ९४ चेंडूंत १० चौकार व ५ षटकारांसह १२८ धावांवर नाबाद राहिला. भारताने ४ बाद ४१० धावा केल्या. 

Web Title: ICC ODI World Cup IND vs NED Live : India's Top 5 scored fifties+ in this match, first time happened in World Cup, HUNDRED BY SHREYAS IYER & KL Rahul, India 410/4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.