Join us  

Ohh No! मोहम्मद सिराज झेल घ्यायला गेला अन्...; भारतीय गोलंदाजाने सोडले मैदान, Video 

ICC ODI World Cup IND vs NED Live : भारतीय फलंदाजांनी उभ्या केलेल्या धावांचा डोंगर सर करताना नेदरलँड्सची दमछाक झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 7:46 PM

Open in App

ICC ODI World Cup IND vs NED Live : भारतीय फलंदाजांनी उभ्या केलेल्या धावांचा डोंगर सर करताना नेदरलँड्सची दमछाक झाली आहे. ३ फलंदाज ८९ धावांत माघारी परतले आहेत. सामना भारताच्या हातात असताना मोहम्मद सिराज दुखापतग्रस्त झाला. झेल घेण्याच्या प्रयत्नात चेंडू गळ्यावर आदळला आणि तो मैदानाबाहेर गेला. 

रोहित शर्मा ( ६१) व शुबमन गिल ( ५१) यांनी शतकी भागीदारी करून टीम इंडियासाठी मजबूत पाया रचला. विराट कोहली ( ५१) व श्रेयस अय्यर यांच्या ७१ धावांच्या खेळीने डावाला आकार दिला. लोकेश राहुल व श्रेयसच्या शतकाने नेदरलँड्समोर ४१० धावांचा डोंगर उभा केला. लोकेश ६४ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह १०२ धावांवर बाद झाला आणि श्रेयससह त्याची २०८ ( १२८ चेंडू) धावांची भागीदारी तुटली. श्रेयस ९४ चेंडूंत १० चौकार व ५ षटकारांसह १२८ धावांवर नाबाद राहिला. भारताने ४ बाद ४१० धावा केल्या.  वन डे वर्ल्ड कपमधील भारताची ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी २००७मध्ये बर्म्युडाविरुद्ध ५ बाद ४१३ धावा चोपल्या होत्या. 

भारताने फोडले World Record ब्रेकिंग फटाके! श्रेयस, लोकेशचे शतक अन् ४१० धावांचा डोंगर

आज भारतीयांकडून एकूण १६ षटकार खेचले गेले आणि २००७ नंतर ( १८ वि. बर्म्युडा ) भारताकडून एका डावात ठोकले गेलेले हे दुसरे सर्वाधिक षटकार ठऱले. राहुल द्रविड ( १४५ वि. श्रीलंका, १९९९) भारतीय यष्टिरक्षकाने केलेली लोकेशची ( १०२) खेळी ही दुसरी सर्वोत्तम ठरली. नेंदरलँड्सला हे आव्हान पेलवणार नाही हे सर्वांना ठाऊक होतं आणि मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात सलामीवीर वेस्ली बार्रेसीला ( ४) बाद केले. मॅक्स ओ'डोड ( ३०) आणि कॉलिन एकरमन ( ३५) यांनी संघर्षमय ६१ धावांची भागीदारी केली. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी या सेट फलंदाजांना माघारी पाठवले. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपमोहम्मद सिराजभारतीय क्रिकेट संघ