शुबमन गिलची फटकेबाजी, सचिन तेंडुलकरशी बरोबरी! विराटला नाही जमलीय अशी कामगिरी

ICC ODI World Cup IND vs NED Live :  रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने भारतीय संघाला पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 03:25 PM2023-11-12T15:25:32+5:302023-11-12T15:25:56+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs NED Live : Shubman Gill equal with Sachin Tendulkar of Fewest innings to 1500 runs in ODIs in a calendar year, Virat and Rohit never Scored 1500+ Runs in ODI Calender Year | शुबमन गिलची फटकेबाजी, सचिन तेंडुलकरशी बरोबरी! विराटला नाही जमलीय अशी कामगिरी

शुबमन गिलची फटकेबाजी, सचिन तेंडुलकरशी बरोबरी! विराटला नाही जमलीय अशी कामगिरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup IND vs NED Live :  रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने भारतीय संघाला पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात करून दिली. या दोघांनी १२ षटकांच्या आत शतकी धावा फलकावर चढवल्या. रोहितने खणखणीत फटकेबाजी करून विक्रमांमागून विक्रम केले, त्यात शुबमननेही नेदरलँड्सच्या गोलंदाजांना धुतले. त्याने या सामन्यात ५२ धावांची खेळी करून मोठा विक्रम नोंदवला आणि थेट सचिन तेंडुलकरशी बरोबरी केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विराट कोहलीलाही हा विक्रम आतापर्यंत करता आलेला नाही. 

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! डिव्हिलियर्स, गांगुलीचा मोडला विक्रम; एका खेळीतून अनेक पराक्रम

टीम इंडियाने आज अखेरच्या साखळी सामन्यात नेदरलँड्सच्या गोलंदाजांना चोपले. रोहित आणि शुबमन यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये ९१ धावा फलकावर चढवल्या. या वर्ल्ड कपमधील नेदरलँड्सविरुद्धची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. शुबमननेही चांगली हात मोकळे केले आणि ३० चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. १२व्या षटकात पॉल व्हॅन मीकेरेनने भारताला पहिला धक्का दिला. गिल ५१ धावांवर बाद झाला आणि रोहितसह त्याची ११.५ षटकांतील १०० धावांची भागीदारी संपुष्टात आली. 


या वर्षात रोहित व शुबमन यांची ही पाचवी शतकी भागीदारी आहे. अफगाणिस्तानच्या इब्राहिम झाद्रान व रहमनुल्लाह गुरबाज यांनी ४ शतकी भागीदारी केल्या आहेत. शुबमनने २०२३ हे वर्ष गाजवले आहे आणि वन डे क्रिकेटमध्ये त्याने १५००+ धावा केल्या आहेत. कॅलेंडर वर्षात सर्वात कमी २७ इनिंग्जमध्ये वन डे क्रिकेटमध्ये १५००+ धावा करण्याच्या सचिन तेंडुलकर ( १९९८) व मॅथ्यू हेडन ( २००७) यांच्याशी शुबमनने आज बरोबरी केली.  कॅलेंडर वर्षात भारताकडून वन डेत १५००+ धावा करणारा शुबमन चौथा फलंदाज ठरला आहे.

Image

सचिनने १९९८ व १९९६ मध्ये अनुक्रमे १८९४ व १६११ धावा केल्या होत्या. सौरव गांगुलीने १९९९ मध्ये १७६७ व राहुल द्रविडने १९९६मध्ये १७६१ धावा केल्या होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विराट कोहलीला कॅलेंडर वर्षात वन डेत एकदाही १५०० धावा करता आलेल्या नाही. सचिनने दोनवेळा, सौरव, राहुल व शुबमन यांनी प्रत्येकी १ वेळा अशी कामगिरी केलीय.   

Web Title: ICC ODI World Cup IND vs NED Live : Shubman Gill equal with Sachin Tendulkar of Fewest innings to 1500 runs in ODIs in a calendar year, Virat and Rohit never Scored 1500+ Runs in ODI Calender Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.