९ वर्षानंतर विराट कोहलीने विकेट घेतली, पाहा अनुष्का किती आनंदी झाली, Video 

ICC ODI World Cup IND vs NED Live : आमच्याकडे wrong-footed inswinging menace आहे, असे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने एका पत्रकार परिषदेत म्हटले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 08:07 PM2023-11-12T20:07:43+5:302023-11-12T20:10:34+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs NED Live : Virat Kohli took wicket after 9 yearsAnushka Sharma couldn't stop herself after Virat took the wicket, Video | ९ वर्षानंतर विराट कोहलीने विकेट घेतली, पाहा अनुष्का किती आनंदी झाली, Video 

९ वर्षानंतर विराट कोहलीने विकेट घेतली, पाहा अनुष्का किती आनंदी झाली, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup IND vs NED Live : आमच्याकडे wrong-footed inswinging menace आहे, असे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने एका पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्याचा इशारा विराट कोहलीकडे होता... भारतीय चाहतेही सातत्याने विराट कोहली को बॉलिंग दो... अशी मागणी करताना दिसले. अखेर रोहित शर्माने चिन्नास्वामी स्टेडियमवर ही मागणी मान्य केली विराटकडे चेंडू सोपवला. त्याने विकेट घेताच स्टेडियम दणाणून निघाले आणि अनुष्का शर्मालाही आनंद लपवता आला नाही. 

Ohh No! मोहम्मद सिराज झेल घ्यायला गेला अन्...; भारतीय गोलंदाजाने सोडले मैदान, Video 

Image
आज भारतीयांकडून एकूण १६ षटकार खेचले गेले आणि २००७ नंतर ( १८ वि. बर्म्युडा ) भारताकडून एका डावात ठोकले गेलेले हे दुसरे सर्वाधिक षटकार ठऱले. राहुल द्रविड ( १४५ वि. श्रीलंका, १९९९) भारतीय यष्टिरक्षकाने केलेली लोकेशची ( १०२) खेळी ही दुसरी सर्वोत्तम ठरली. नेंदरलँड्सला हे आव्हान पेलवणार नाही हे सर्वांना ठाऊक होतं आणि मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात सलामीवीर वेस्ली बार्रेसीला ( ४) बाद केले. मॅक्स ओ'डोड ( ३०) आणि कॉलिन एकरमन ( ३५) यांनी संघर्षमय ६१ धावांची भागीदारी केली. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी या सेट फलंदाजांना माघारी पाठवले. 


चाहते कोहलीला गोलंदाजी देण्यासाठी मागणी करत होते आणि रोहितने चेंडू विराटकडे सोपवताच एकच जल्लोष झाला. विराटने पहिल्याच षटकात विकेट मिळवलीच होती, परंतु स्लीपमध्ये खेळाडू नसल्याने सायब्रँड एंग्लेब्रेच वाचला. परंतु पुढच्या षटकात विराटने नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्डला ( १७) माघारी पाठवले. यष्टिरक्षक लोकेशने सुरेख झेल घेतला. विराट कोहलीची ही वन डेमधील पाचवी विकेट ठरली. अॅलिस्टर कूक ( ५०), क्रेग किएस्वेटर ( ३६), क्विंटन डी कॉक ( १३५) व ब्रेंडन मॅक्युलम ( २३) यांना विराटने बाद केले आहे. २०१४ मध्ये विराटने शेवटची विकेट घेतली होती आणि ९ वर्षानंतर त्याने विकेट घेतली.  

Image

Web Title: ICC ODI World Cup IND vs NED Live : Virat Kohli took wicket after 9 yearsAnushka Sharma couldn't stop herself after Virat took the wicket, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.