Join us  

मोहम्मद शमी म्हणजे विकेटची हमी! पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुलचा अविश्वसनीय झेल, Video

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : फलंदाजांनी न्यूझीलंडला झोडल्यानंतर भारतीय गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 6:59 PM

Open in App

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : फलंदाजांनी न्यूझीलंडला झोडल्यानंतर भारतीय गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला.  जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांच्या गोलंदाजीचा सावध सामना केल्यानंतर गोलंदाजीत बदल केला गेला. मोहम्मद शमीने त्याच्या पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडला धक्का दिला. लोकेश राहुलने डाईव्ह मारून अफलातून झेल घेतला. बाजूला उभा असलेला विराट कोहली आश्चर्याने पाहतच राहिला. पुढच्या षटकात शमीने किवींचा दुसरा सलामीवीर रचिन रवींद्रलाही बाद करून ३९ धावांवर दुसरा धक्का दिला.

विराट, रोहितने विश्वविक्रम रचले; सोबत टीम इंडियाच्या नावावरही ८ मोठे पराक्रम लिहिले गेले

रोहित शर्मा  (४७) आणि शुबमन गिल यांनी ७१ धावांची वादळी सुरुवात करून दिल्यानंतर विराट व श्रेयस यांनी १२८ चेंडूंत १६३ धावांची भागीदारी केली. विराटने आज पन्नासावे शतक झळकावून विश्वविक्रम रचला आणि त्याच्या खेळीला ४४व्या षटकात ब्रेक लागला. तो ११३ चेंडूंत ९ चौकार व २ षटकार खेचून ११७ धावांवर बाद झाला. श्रेयसने ७० चेंडूंत ४ चौकार व ८ षटकारांसह १०५ धावांची वादळी खेळी केली. लोकेश राहुलसह त्याने २९ चेंडूंत ५४ धावा जोडल्या. लोकेश २० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ३९ धावांवर नाबाद राहिला, तर शुबमन ६६ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ८० धावांवर नाबाद राहिला. भारताने ४ बाद ३९७ धावा केल्या.

जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांचा न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी संयमाने सामना केला. सहाव्या षटकात रोहितने चेंडू मोहम्मद शमीच्या हाती सोपवला आणि त्याने पहिले यश मिळवून दिले. शमीने टाकलेला पहिलाच चेंडू डेवॉन कॉनवेच्या ( १३) बॅटची कड घेत यष्टिंमागे गेला अन् लोकेशने डाव्या बाजूला झेप घेत अविश्वसनीय झेल टिपला. पुढच्या षटकात शमी व लोकेश जोडीने पुन्हा कमाल केली आणि रचिन १३ धावांवर झेलबाद झाला. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध न्यूझीलंडमोहम्मद शामीलोकेश राहुल