ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : रोहित शर्माच्या वादळानंतर वानखेडे स्टेडियम शुबमन गिलची ( Shubman Gill ) बॅट तळपली. रोहितचे अर्धशतक ४७ धावांनी हुकले असले तरी शुबमनने फिफ्टी मारून इतिहास रचला. त्याने सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल टाकले. रोहितसह त्याने २३ वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला.
वानखेडेवर सन्नाटा! केन 'मामा'ने टिपला रोहितचा अफलातून झेल, 'हिटमॅन' ठरला सेव्हन वंडर्स, Video
रोहितच्या फटकेबाजीने आज वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले. त्याने शुबमन गिलसह पहिल्या विकेटसाठी ८.२ षटकांत ७१ धावा जोडल्या. टीम साऊदीच्या चेंडूवर रोहितचा फटका चुकला अन् उत्तुंग उडाललेा चेंडू केन विलियम्सनच्या सुरक्षित हातात विसावला. रोहित २९ चेंडूं ४ चौकार व ४ षटकारांसह ४७ धावांवर झेलबाद झाला. रोहितच्या विकेटनंतर स्टेडियमवर स्मशान शांतता पसरली. आजच्या लढतीपूर्वी रोहितने वानखेडेवर १६, २०, १०, ४ अशा धावा केल्या होत्या.
रोहितने आजच्या खेळीसह वर्ल्ड कप इतिहासात १५०० धावांचा टप्पा ओलांडला. भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये २००० धावा करणारा तो सातवा कर्णधार ठरला. महेंद्रसिंग धोनी ( ६६४१), विराट कोहली ( ५४४९), मोहम्मद अझरुद्दीन ( ५२३९), सौरव गांगुली ( ५०८२), राहुल द्रविड ( २६५८), सचिन तेंडुलकर ( २४५४) यांनी हा टप्पा ओलांडला आहे. रोहितने सेट केलेलं वातावरण शुबमनने पुढे सुरू ठेवले आणि अर्धशतक झळकावले.
वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सचिन तेंडुलकरनंतर अर्धशतक झळकावणारा तो दुसरा भारतीय सलामीवीर ठरला. सचिनने ( १९९६, २००३ व २०११) तीन वेळा असा पराक्रम केला आहे. कॅलेंडर वर्षात सर्वाधिक १४ फिफ्टी प्लस धावांची भागीदारी करण्याचा विक्रमही रोहित-शुबमन जोडीने आज केला. २००७ मध्ये अॅडम गिलख्रिस्ट व मॅथ्यू हेडन यांनी १३ वेळा अशी कामगिरी केली होती. शिवाय कॅलेंडर वर्शात सर्वाधिक धावांच्या भागीदारीच्या विक्रमात रोहित-शुबमन यांनी तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. या दोघआंनी २०२३ मध्ये १४९३ धावा जोडल्या आणि २००० सालचा गांगुली-तेंडुलकरचा १४८३ धावांचा विक्रम मोडला. या विक्रमात गांगुली-तेंडुलकर १६३५ ( १९९८) आणि गिलख्रिस्ट-मार्क वॉ १५१८ ( १९९९) हे आघाडीवर आहेत.
Web Title: ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : Shubman Gill becomes the first Indian opener not named Sachin Tendulkar to score a fifty in men's World Cup Semifinals.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.