ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्या वादळी खेळीनंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) वानखेडेचे मैदान गाजवले. त्याने अर्धशतक झळकावून सचिन तेंडुलकचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. त्याने ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पाँटिंग याचाही विक्रम मोडला.
Ohh No! शुबमन गिलने लाईव्ह मॅचमध्येच मैदान सोडले, जाणून घ्या नेमके असे काय घडले?
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला अन् पहिल्या षटकापासून न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चोप दिला. वन डे वर्ल्ड कप इतिहासात सर्वाधिक ५० षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड रोहितने नावावर करताना टीम इंडियाला दणदणीत सुरुवात करून दिली. रोहित २९ चेंडूं ४ चौकार व ४ षटकारांसह ४७ धावांवर झेलबाद झाला आणि शुबमन गिलसोबत त्याची ७१ धावांची भागीदारी संपुष्टात आली. शुबमनने अर्धशतक झळकावताना सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अर्धशतक झळकावणारा तो दुसरा भारतीय सलामीवीर ठरला. सचिनने ( १९९६, २००३ व २०११) तीन वेळा असा पराक्रम केला आहे.
२३व्या षटकात शुबमनने रिटायर्ड हर्ट म्हणून तंबूत परत जाण्याचा निर्णय घेतला. त्याने ६५ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ७९ धावांची खेळी केली. त्याच्या पायात गोळा आल्याने हा निर्णय घेतला. टाळ्यांच्या कडकडाटात शुबमनच्या खेळीचे कौतुक केले गेले. त्यानंतर
विराट कोहलीने मोर्चा सांभाळला. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटने आज ऑस्टेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंगला ( १३७०४) मागे टाकले.
सचिन तेंडुलकर ( १८४२६) व कुमार संगकारा ( १४२३४) हे दोनच पलंदाज आता विराटच्या पुढे आहेत.
वर्ल्ड कपच्या एकाच पर्वात ६००+ धावा करणारा विराट सहावा फलंदाज ठऱला. सचिन तेंडुलकर ( २००३), मॅथ्यू हेडन ( २००७), रोहित शर्मा ( २०१९), डेव्हिड वॉर्नर ( २०१९), शाकिब अल हसन ( २०१९) यांनी असा पराक्रम केला होता. वर्ल्ड कपच्या एकाच पर्वात सर्वाधिक ८ वेळा फिफ्टी प्लस धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्याने सचिन तेंडुलकर ( २००३) व शाकिब अल हसन ( २०१९) यांचा ७ फिफ्टी प्लस धावांचा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विराटची ही २१७ वी फिफ्टी प्लस धावांची खेळी ठरली आणि त्याने पाँटिंगशी बरोबरी केली.
Web Title: ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : Virat Kohli becomes third highest run-getter in ODIs. he becames the 1st Player to hit EIGHT 50+Scores in a World Cup Edition.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.