Join us  

IND vs PAK : मला हा BCCI चा इव्हेंट वाटला; मिकी आर्थर यांचा खोचक टोमणा, तर बाबर आजम म्हणतो... 

ICC ODI World Cup India vs Pakistan Live : पाकिस्तान संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध ८व्या सामन्यांत हार पत्करावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 9:04 PM

Open in App

ICC ODI World Cup India vs Pakistan Live : पाकिस्तान संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध ८व्या सामन्यांत हार पत्करावी लागली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर जवळपास सव्वा लाख प्रेक्षकांसमोर भारताने शेजाऱ्यांवर ७ विकेट्स व ११७ चेंडू राखून दणदणीत विजयाची नोंद केली. पाकिस्तानचे १९१ धावांचे लक्ष्य भारताने ३०.३ षटकांत सहज पार केले. रोहित शर्माने ८६ धावांची वादळी खेळी केली, श्रेसय अय्यरने नाबाद ५३ धावा केल्या. या विजयासोबत भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले, परंतु पाकिस्तानी प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी खोचक टोमणा मारला.  

८-०! भारताचा 'डबल' अटॅक; पाकिस्तानला पराभूतही केलं अन् Point Table मध्ये दिला झटका

प्रथम फलंदाजीला आलेला पाकिस्तानचा संघ २ बाद १५५ अशा मजबूत स्थितीत होता, परंतु पुढील ३६ धावांत त्यांचे ८ फलंदाज माघारी परतले अन् त्यांचा संपूर्ण संघ १९१ धावांवर तंबूत गेला. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा व सिराज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. बाबर आजम ( ५०) आणि मोहम्मद रिझवान  ( ४९)  यांचा खेळ चांगला झाला. भारताकडून रोहित शर्मा दमदार खेळला. रोहितने ६३ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारासह ८६ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यर ६२ चेंडूंत ५३ धावांवर नाबाद राहिला. शुबमन गिल ( १६), विराट कोहली ( १६) व लोकेश राहुल ( १९*) यांनीही चांगला खेळ केला.  

भारताने या विजयासह १.८२१ अशा नेट रन रेटसह अव्वल स्थानी झेप घेतली. पाकिस्तान -०.१३७ अशा नेट रन रेटसह चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. न्यूझीलंड ६ गुण व १.६०४ नेट रन रेटसह दुसऱ्या, तर दक्षिण आफ्रिका २.३६० नेट रन रेट व ४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पराभवानंतर बाबर आजम  म्हणाला,  आम्ही चांगली सुरुवात केली, भागीदारीही केली. पण, अचानक आमचा संघ गडगडला आणि आम्हाला शेवट चांगला करता नाही आला. आम्ही ज्याप्रकारे सुरुवात केली होती, ते पाहता २८०-२९० पर्यंत जायला हवं होतं, परंतु त्या पडझडीचा फटका बसला. नव्या चेंडूसह आम्ही कमाल नाही करू शकतो. रोहितने आज अविश्वसनीय खेळ केला.  

पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर म्हणाले, मला आज ही आयसीसीची स्पर्धा वाटली नाही, मी प्रामाणिक मत मांडतोय. मला आजचा सामना हा द्विदेशीय किंवा बीसीसीआयचा इव्हेंट वाटला. मला माईकवर दिल दिल पाकिस्तान हे ऐकू आले नाही. याचाही खेळावर परिणाम होतो, परंतु मला कोणतंही कारण द्यायचं नाही. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तानबाबर आजमरोहित शर्मा