ICC ODI World Cup India vs Pakistan Live : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तानने सपशेल शरणागती पत्करलेली पाहायला मिळाली. बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान यांनी काही काळासाठी डाव सावरला. पण, ही जोडी मोहम्मद सिराजने तोडली अन् एकामागून एक फलंदाज तंबूत परतले. पाकिस्तानने अवघ्या ३६ धावांत ८ फलंदाज गमावले. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा व सिराज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
IND vs PAK Live : बाबर आजम Umpire Call मुळे वाचला, पण मोहम्मद सिराजच्या कचाट्यात गावला, त्रिफळाच उडवला, Video
भारत-पाकिस्तान महामुकाबला सुरू आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. अब्दुल्लाह शफीक ( २०) आणि इमाम-उल-हक ( ३६) यांना अनुक्रमे मोहम्मद सिराज आणि हार्दिक पांड्या यांनी माघारी पाठवले. कर्णधार बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान यांनी संयमी खेळ करताना ८३ धावांची भागीदारी करुन पाकिस्तानला सावरले. पण, सिराजने अर्धशतकवीर बाबरचा ( ५०) त्रिफळा उडवला अन् नंतर कुलदीप यादवने एकाच षटकात दोन धक्के देऊन पाकिस्तानला बॅकफूटवर फेकले. सौद शकील ( ६) आणि इफ्तिखार अहमद ( ४) हे कुलदीपचे बळी ठरले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने मोहम्मद रिझवानचा ( ४९) त्रिफळा उडवला आणि पाठोपाठ शादाब खानचीही ( २) दांडी गुल केली.
हार्दिकने पाकिस्तानला आणखी एक धक्का देताना मोहम्मद नवाजला ( ४) झेलबाद केले आणि पाकिस्तानचे ८ फलंदाज १८७ धावांवर तंबूत परतले. रवींद्र जडेजाला आक्रमक फटके मारण्याच्या प्रयत्नात हसन अली ( १२) झेलबाद झाला. ३ बाद १५५ वरून पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९१ धावांत तंबूत परतला.
पाकिस्तानची पडझड
155 for 3
162 for 4
166 for 5
168 for 6
171 for 7
187 for 8
187 for 9
191 for 10
Web Title: ICC ODI World Cup IND vs PAK Live : PAKISTAN COLLAPSED FOR 191, From 155/2 to 191/10 - Pakistan lost 36/8, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.