Join us  

IND vs PAK Live : रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांना झोडून काढले, हिटमॅनने विक्रमी 'त्रिशतक' ठोकले, Video 

ICC ODI World Cup India vs Pakistan Live : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत माता की जयचा नारा पाहून पाकिस्तानी सैरभैर झाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 6:38 PM

Open in App

ICC ODI World Cup India vs Pakistan Live : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत माता की जयचा नारा पाहून पाकिस्तानी सैरभैर झाले... वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान या महामुकाबल्यात शेजाऱ्यांनी गुडघे टेकले. पाकिस्तानला १९१ धावांवर ऑल आऊट केल्यानंतर भारतीय फलंदाजांनी गोलंदाजांना झोडून काढले. रोहित शर्माने ( Rohit Sharma) ३ षटकार खेचून आज विक्रमी कामगिरी केली. 

पाकिस्तानने अवघ्या ३६ धावांत ८ फलंदाज गमावले. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा व सिराज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. वर्ल्ड कप स्पर्धेत तिसऱ्यांदा पाच गोलंदाजांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत. २०११मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध अशी कामगिरी पहिल्यांदा केली होती. अब्दुल्लाह शफीक ( २०) आणि इमाम-उल-हक ( ३६) हे माघारी परतल्यानंतर बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांनी ८३ धावांची भागीदारी करुन पाकिस्तानला सावरले. पण, सिराजने अर्धशतकवीर बाबरचा ( ५०) त्रिफळा उडवला. सौद शकील ( ६) आणि इफ्तिखार अहमद ( ४) हे कुलदीपचे बळी ठरले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने रिझवानचा ( ४९) त्रिफळा उडवला आणि पाठोपाठ शादाब खानचीही ( २) दांडी गुल केली. २ बाद १५५ वरून पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९१ धावांत तंबूत परतला.   

वर्ल्ड कप स्पर्धेतील पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या शुबमन गिलने धमाकेदार सुरुवात केली. हसन अलीच्या षटकात त्याने ३ चौकार खेचून पाकिस्तानी गोलंदाजांना दडपणात आणले. शाहीन आफ्रिदीच्या तिसऱ्या षटकात गिलने ( १६)  पॉईंटच्या दिशेने जोरदार फटका मारला, परंतु शादाब खानने सुरेख झेल टिपला. रोहित शर्मा व विराट कोहली यांनी पाकिस्तानला चोप दिला. रोहितला बाऊन्सर टाकल्याचा परिणाम शाहीन आफ्रिदीने पाहिला. रोहितने पूल शॉट खेचून चेंडू प्रेक्षकांमध्ये पाठवला. हॅरिस रौफला रोहितने खेचलेला खणखणीत षटकार विक्रमी ठरला. आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यांत ३०० षटकार खेचणारा तो जगातील तिसरा आणि पहिला भारतीय फलंदाज ठरला. शाहिद आफ्रिदी ( पाकिस्तान) ३५१ आणि ख्रिस गेल ( वेस्ट इंडिज) ३३१ षटकारांसह रोहितच्या पुढे आहेत.  

 
टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तानरोहित शर्मा