IND vs PAK : बाबर आजम पराभवानंतर विराटकडे टीम इंडियाची जर्सी घेऊन पोहोचला, कोहलीने काय केलं ते पाहा, Video

ICC ODI World Cup India vs Pakistan Live : पाकिस्तान संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध ८व्या सामन्यांत हार पत्करावी लागली. भारताने शेजाऱ्यांवर ७ विकेट्स व ११७ चेंडू राखून दणदणीत विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 09:21 PM2023-10-14T21:21:15+5:302023-10-14T21:22:18+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs PAK Live : Virat Kohli gifted a signed Indian jersey to Babar when he asked after the game, Video Viral | IND vs PAK : बाबर आजम पराभवानंतर विराटकडे टीम इंडियाची जर्सी घेऊन पोहोचला, कोहलीने काय केलं ते पाहा, Video

IND vs PAK : बाबर आजम पराभवानंतर विराटकडे टीम इंडियाची जर्सी घेऊन पोहोचला, कोहलीने काय केलं ते पाहा, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup India vs Pakistan Live : पाकिस्तान संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध ८व्या सामन्यांत हार पत्करावी लागली. भारताने शेजाऱ्यांवर ७ विकेट्स व ११७ चेंडू राखून दणदणीत विजयाची नोंद केली. पाकिस्तानचे १९१ धावांचे लक्ष्य भारताने ३०.३ षटकांत सहज पार केले. रोहित शर्माने ८६ धावांची वादळी खेळी केली, श्रेसय अय्यरने नाबाद ५३ धावा केल्या. या पराभवानंतर बाबर आजम ( Babar Azam) आणि विराट कोहली ( Virat Kohli) यांच्यात फॅनबॉय क्षण पाहायला मिळाला... 


मला हा BCCI चा इव्हेंट वाटला; मिकी आर्थर यांचा खोचक टोमणा, तर बाबर आजम म्हणतो... 

पाकिस्तानचा संघ २ बाद १५५ अशा मजबूत स्थितीत होता, परंतु पुढील ३६ धावांत त्यांचे ८ फलंदाज माघारी परतले अन् त्यांचा संपूर्ण संघ १९१ धावांवर तंबूत गेला. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा व सिराज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. बाबर आजम ( ५०) आणि मोहम्मद रिझवान  ( ४९)  यांचा खेळ चांगला झाला. भारताकडून रोहित शर्मा दमदार खेळला. रोहितने ६३ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारासह ८६ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यर ६२ चेंडूंत ५३ धावांवर नाबाद राहिला. शुबमन गिल ( १६), विराट कोहली ( १६) व लोकेश राहुल ( १९*) यांनीही चांगला खेळ केला.  


भारताने या विजयासह १.८२१ अशा नेट रन रेटसह अव्वल स्थानी झेप घेतली. पाकिस्तान -०.१३७ अशा नेट रन रेटसह चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. न्यूझीलंड ६ गुण व १.६०४ नेट रन रेटसह दुसऱ्या, तर दक्षिण आफ्रिका २.३६० नेट रन रेट व ४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर भारताचा स्टार फलंदाज विराटकडे गेला अन् त्याच्याकडे टीम इंडियाच्या जर्सीवर स्वाक्षरी मागितली. विराटनेही लगेच त्याची विनंती मान्य केली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


Web Title: ICC ODI World Cup IND vs PAK Live : Virat Kohli gifted a signed Indian jersey to Babar when he asked after the game, Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.