Join us  

विराट-श्रेयसचा खेळ पाहून रोहित चिडला, द्रविडशी चर्चा करून इशानकरवी मॅसेज पाठवला अन्.. 

ICC ODI World Cup India vs South Africa Live Marathi : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील दोन तगडे संघ भारत व दक्षिण आफ्रिका आज कोलकाता येथे एकमेकांविरुद्ध खेळत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 4:11 PM

Open in App

ICC ODI World Cup India vs South Africa Live Marathi : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील दोन तगडे संघ भारत व दक्षिण आफ्रिका आज कोलकाता येथे एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. रोहित शर्माने आक्रमक सुरुवात करून दिल्यानंतर आफ्रिकेला दोन विकेट मिळवण्यात यश आले. त्यानंतर विराट कोहलीश्रेयस अय्यर यांना आफ्रिकेच्या गोलंदाजांनी जखडून ठेवले. १ ते १० षटकांत ९१ धावा करणाऱ्या भारतीय संघाला पुढील १५ षटकांत केवळ ५२ धावा करता आल्या अन् हे पाहून रोहित शर्मा चिडला. त्याने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा करून इशान किशनच्या माध्यमातून विराट-श्रेयस यांच्यासाठी मॅसेज पाठवला.  

शुबमन गिलच्या 'बेल्स' उडाल्या; विराट अन् अम्पायर्सही शॉक, आफ्रिकेचा महा'राज', Video 

रोहित त्याच्या आवडत्या ईडन गार्डनवर दणक्यात सुरुवात करून दिली. त्याने  २४ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४० धावा चोपल्या. कागिसो रबाडाने त्याच्या पहिल्या षटकात रोहितला बाद केले आणि शुबमन गिलसह त्याने ३५ चेंडूंत ६२ धावांची भागीदारी केली. रोहित माघारी जात असताना बर्थ डे बॉय विराट कोहली मैदानावर आला अन् स्टेडियम त्याच्या नावाने दणाणून निघाले. विराट व शुबमन यांनी काही सुरेख फटके मारले आणि २८ चेंडूंत ३१ धावा जोडल्या. केशव महारजने बॉल ऑफ दी टुर्नामेंट फेकून शुबमनचा ( २३) त्रिफळा उडवला. भारताने या सामन्यात पहिल्या १० षटकांत १ बाद ९१ धावा केल्या आणि पुढच्या १० षटकांत भारताला १ बाद ३३ धावा करता आल्या. ९.१०चा रन रेट पुढील १० षटकांत ३.३० असा कमी राहिला. 

विराट व श्रेयस अय्यर यांच्या आक्रमक फलंदाजीवर अंकुश ठेवण्यात आफ्रिकन गोलंदाजांना यश आले होते. २०व्या षटकात तब्रेझ शम्सीला आणले आणि त्याच्या पहिल्याच षटकात तीन झेल उडाले होते, परंतु तिथे फिल्डर नसल्याने विराट-श्रेयस वाचले. २१व्या षटकात महाराजने टाकलेला आणखी अविश्वसनीय चेंडू विराटच्या बॅटच्या अगजी जवळून गेला अन् यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकने DRS ची मागणी केली. पण, रिप्लेत अल्ट्रा एज न दिसल्याने स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. विराटनेही सांगितलं की तो आवाज बॅट अन् पॅडचा संपर्क झाल्यामुळे आलेला.

रोहितने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडशी चर्चा करून इशान किशनकरवी विराट-श्रेयस यांच्यासाठी वेग वाढवण्याचा मॅसेज पाठवला. त्यानंतर श्रेयसकडून एक चौकार आला आणि त्याने विराटसह ८६ चेंडूंत ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. त्यानंतर विराटने ६७ चेंडूंत आणखी एक अर्धशतक पूर्ण केले. रोहितच्या मॅसेजनंतर धावांचा वेग वाढला आणि भारताने २६ ते ३० षटकांत ७.२० च्या सरासरीने ३६ धावा केल्या. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपश्रेयस अय्यरविराट कोहलीरोहित शर्माभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका