Join us  

बर्थ डे बॉय विराट कोहलीचा भीमपराक्रम! सचिन तेंडुलकरनंतर हा विक्रम नोंदवणारा एकमेव फलंदाज 

ICC ODI World Cup India vs South Africa Live Marathi : रोहितने  २४ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४० धावा चोपून शुबमन गिलसह ( २३) ३५ चेंडूंत ६२ धावांची भागीदारी केली. पण, हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर भारतीय संघाच्या धावांचा वेग मंदावला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 4:28 PM

Open in App

ICC ODI World Cup India vs South Africa Live Marathi : रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर विराट कोहलीश्रेयस अय्यर यांनी भारतीय संघाचा डाव सावरला. सुरुवातीला संथ खेळ करून सेट झाल्यानंतर विराट व श्रेयस यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. दोघांनीही अर्धशतक झळकावले आणि विराटने आणखी एक भीमपराक्रम केला. 

विराट-श्रेयसचा खेळ पाहून रोहित चिडला, द्रविडशी चर्चा करून इशानकरवी मॅसेज पाठवला अन्.. 

रोहितने  २४ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४० धावा चोपून शुबमन गिलसह ( २३) ३५ चेंडूंत ६२ धावांची भागीदारी केली. पण, हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर भारतीय संघाच्या धावांचा वेग मंदावला. १ ते १० षटकांत ९१ धावा करणाऱ्या भारतीय संघाला पुढील १५ षटकांत केवळ ५२ धावा करता आल्या अन् हे पाहून रोहित शर्मा चिडला. त्याने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा करून इशान किशनच्या माध्यमातून विराट-श्रेयस यांच्यासाठी मॅसेज पाठवला. त्यानंतर श्रेयस व विराट यांनी फटकेबाजी सुरू केली. विराटने ६७ चेंडूंत एक अर्धशतक पूर्ण केले. रोहितच्या मॅसेजनंतर धावांचा वेग वाढला आणि भारताने २६ ते ३० षटकांत ७.२० च्या सरासरीने ३६ धावा केल्या. 

वर्ल्ड कपच्या एका पर्वात सर्वाधिक 50+ धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटने ( ६) डेव्हिड वॉर्नर ( २०१९) व रोहित शर्मा ( २०१९) यांच्याशी बरोबरी केली. सचिन तेंडुलकर ( २००३) व शाकिब अल हसन ( २०१९) यांनी सर्वाधिक ७ वेळा असा पराक्रम केला आहे. वाढदिवसाला 50+ धावा करणारा विराट पाचवा भारतीय फलंदाज ठरला. सचिन तेंडुलकर व विनोद कांबळी यांना शतक झळकावता आले आहे. तर नवज्योत सिंग सिद्ध व इशान किशन अर्धशतकच करू शकले. विराटपाठोपाठ श्रेयसनेही अर्धशतक पूर्ण करताना आक्रमणाला सुरुवात केली आणि १२९ चेंडूंत शतकी भागीदारीही पूर्ण केली.

विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३००० धावा आज पूर्ण केल्या आणि सचिननंतर ( ३७५२) हा टप्पा ओलांडणारा तो दुसरा भारतीय ठरला. राहुल द्रविड ( २५६१), सौरव गांगुली ( २२६०) व रोहित शर्मा ( १९०४) हे पाठोपाठ आहेत. शिवाय विराटने भारतात वन डे क्रिकेटमधील ६००० धावांचा टप्पाही ओलांडला आणि सचिननंतर असा पराक्रम करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. सचिनने ६९७६ धावा केल्या आहेत. घरच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणाऱ्या अन्य फलंदाजामध्ये रिकी पाँटिंग ( ५५२१) तिसऱ्या क्रमांकावर आहे.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीसचिन तेंडुलकरश्रेयस अय्यर