Join us  

शुबमन गिलच्या 'बेल्स' उडाल्या; विराट अन् अम्पायर्सही शॉक, आफ्रिकेचा महा'राज', Video 

ICC ODI World Cup India vs South Africa Live Marathi : रोहित शर्माने आज पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात करून देताना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना हैराण केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 3:21 PM

Open in App

ICC ODI World Cup India vs South Africa Live Marathi :  भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माने आज पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात करून देताना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना हैराण केले होते. आफ्रिकेने त्यांच्या अनुभवी गोलंदाज कागिसो रबाडाला गोलंदाजीला आणले आणि त्याने रोहितची विकेट मिळवून दिली. कर्णधार टेम्बा बवुमाने अप्रतिम झेल घेतला. त्यानंतर शुबमन गिल केशव महाराजच्या गोलंदाजीवर जसा बाद झाला ते पाहून सर्वांनाच शॉक बसला. 

एकटा रोहित शर्मा श्रीलंका, पाकिस्तान, इंग्लंडवर भारी पडलाय! भारताने मोठा विक्रम नोंदवला 

ईडन गार्डनवर रोहित शर्माला फलंदाजी करायला नेहमी आवडते आणि आजही त्याने तिसरा चेंडू पदलालित्य दाखवून चौकार पाठवला. त्याने मारलेले पुल शॉट नेत्रदिपक राहिले. त्याच्या फटकेबाजीमुळे भारताने ४.३ षटकांत ५० धावा फलकावर चढवल्या आणि वर्ल्ड कपमधील ही एखाद्या संघाची दुसरी जलद हाफ सेंच्युरी ठरली. पण,  कागिसो रबाडाने त्याच्या पहिल्याच षटकात रोहितला बाद केले. रोहितने २४ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४० धावा केल्या. रोहितने शुबमन गिलसोबत ३५ चेंडूंत ६२ धावा चोपल्या. रोहित माघारी जात असताना बर्थ डे बॉय विराट कोहली मैदानावर आला अन् स्टेडियम त्याच्या नावाने दणाणून निघाले.

विराट व शुबमन यांनी काही सुरेख फटके मारले आणि २८ चेंडूंत ३१ धावा जोडल्या. केशव महारजने पहिल्याच षटकात स्टेडियमवर स्मशान शांतता पसरवली. त्याने टाकलेला चेंडू असा अप्रतिम वळला की त्याने शुबमनच्या बॅट अन् पॅडला चकवून यष्टींचा वेध घेतला. चेंडूने बरोबर बेल्स उडवल्या. शुबमन गुडघ्यावर बसून राहिला अन् नॉन स्ट्राईकवर असलेला विराट शॉक्ड झाला... मैदानावरील अम्पायर्सनाही काही कळेना आणि त्यांनी तिसऱ्या अम्पायरची मदत घेतली... शुबमनला २३ धावांवर माघारी जावे लागले.  भारताने या सामन्यात पहिल्या १० षटकांत १ बाद ९१ धावा केल्या आणि या वर्ल्ड कपमधील ही त्यांची दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. पण, पुढच्या ६ षटकांत भारताला १ बाद १६ धावा करता आल्या. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपशुभमन गिलभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीरोहित शर्मा