'बर्थ डे'ला शतक झळकावल्याचा आनंद...! सचिनच्या 'विराट' विक्रमाशी बरोबरीनंतर कोहली म्हणतो... 

ICC ODI World Cup India vs South Africa Live Marathi : कोलकाताचं ईडन गार्डन आज पुन्हा एकदा विराट कोहलीच्या ( Virat Kohli) जयघोषाने दणाणून निघाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 06:54 PM2023-11-05T18:54:06+5:302023-11-05T18:54:36+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs SA Live Marathi : It's great to get a hundred on my birthday in front of this big crowd at this great venue, Virat Kohli   | 'बर्थ डे'ला शतक झळकावल्याचा आनंद...! सचिनच्या 'विराट' विक्रमाशी बरोबरीनंतर कोहली म्हणतो... 

'बर्थ डे'ला शतक झळकावल्याचा आनंद...! सचिनच्या 'विराट' विक्रमाशी बरोबरीनंतर कोहली म्हणतो... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup India vs South Africa Live Marathi : कोलकाताचं ईडन गार्डन आज पुन्हा एकदा विराट कोहलीच्या ( Virat Kohli) जयघोषाने दणाणून निघाले. २४ डिसेंबर २००९ मध्ये विराटने वन डे क्रिकेटमधील पहिले शतकच याच ऐतिहासिक मैदानावर झळकावले होते आणि आज १४ वर्षानंतर त्याने विश्वविक्रमी ४९वे शतक झळकावले. विराटने यासह सचिन तेंडुलकरच्या वन डेतील सर्वाधिक शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. हा ऐतिहासिक क्षण टिपण्यासाठी स्टेडियमवरील उपस्थित सर्वांनी आपले मोबाईल उंचावले होते. ७० हजार प्रेक्षकांच्या मोबाईलच्या फ्लॅशलाईटमध्ये विराटने झळकावलेले शतक खूप भावनिक राहिले. 

‘बार बार दिन ये आये…’, वाढदिवशी ‘विराट’ शतक, सचिनच्या विश्वविक्रमाच्या बरोबरीसह अनेक पराक्रम

दोन वेळा शतकाच्या उंबरठ्यावरून माघारी परतल्यानंतर अखेर विराट कोहलीने ( Virat Kohli) वाढदिवशी ऐतिहासिक ४९वे शतक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराटने १२१ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद १०१ धावा केल्या. वाढदिवशी शतक झळकावून विराटने आणखी एक पराक्रम केला. वाढदिवसाला वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा विराट हा जगातील सातवा आणि तिसरा भारतीय ठरला. १९९३ मध्ये विनोद कांबळीने नाबाद १०० ( वि. इंग्लंड), सचिन तेंडुलकर १३४ ( वि. ऑस्ट्रेलिया, १९९८) यांनी वाढदिवसाला शतक झळकावले आहे. 

Image
या शतकानंतर विराट म्हणाला, ही खेळपट्टी फलंदाजीसाठी वाटते तेवढी सोपी नाही. रोहित आणि शुबमनने आम्हाला चांगली सुरुवात करून दिली. ती तशीच पुढे चालू ठेवणे हे माझं काम होतं. १०व्या षटकानंतर चेंडू चांगला वळत होता आणि ग्रिप घेत होता. त्यामुळे धावगती मंदावली आणि शेवटपर्यंत सहकाऱ्यांसोबत खेळत राहणे ही माझी भूमिका होती. संघ व्यवस्थापनाने हे मला सांगितले होते. श्रेयस अय्यरने चांगला खेळ केला आणि आम्ही काही अतिरिक्त धावा मिळवू शकलो. 

Image
आशिया चषक स्पर्धेदरम्यान तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर खेळताना आमच्यात सातत्याने चर्चा होत होती. त्या जोरावर ही भागीदारी केली आणि खेळ पुढे नेण्यासाठी ती गरजेची होती. संघात हार्दिक नाही, म्हणून आम्हाला माहित होते की एक किंवा दोन विकेट आम्हाला महागात पडू शकतात. त्यामुळे आम्ही अखेरपर्यंत खेळण्यावर भर दिला. देवाने मला खेळण्याची आणि संघाच्या यशासाठी योगदान देण्याची संधी दिली हे मी भाग्य समजतो. वाढदिवसाला शतक झळकावल्याचा आनंद आहे आणि तोही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसमोर. खेळपट्टी संथ आहे, आमच्याकडे दर्जेदार गोलंदाजी लाइनअप आहे, परंतु आम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.  

Web Title: ICC ODI World Cup IND vs SA Live Marathi : It's great to get a hundred on my birthday in front of this big crowd at this great venue, Virat Kohli  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.